मनातून नातं संपलंय की अजूनही अडकले आहात? Move On झाल्याचे 'हे' बदल नक्कीच ओळखा
Relationship Tips: एकमेकांच्या प्रेमात बुडणं आणि त्यानंतर काही कारणाने एकमेकांपासून दूर होणं हे बऱ्याच लोकांच्या नात्यात होत असतं. पण अनेकदा पहिल्या नात्यातून बाहेर पडणं अनेकांसाठी त्रासदायक असतं. अशावेळी आपण जगासाठी तर Move On झालेले असतो. पण स्वतःला विचारून तुम्ही पहा की तुम्ही खरंच मुव्ह ऑन झाला आहात की नाही? आता हे नक्की कसं कळणार. तर या व्हिडिओतून आम्ही ५ सोप्या गोष्टी सांगत आहोत, तुम्हीही आयुष्यात पहिल्या नात्यातून योग्य पद्धतीने बाहेर आला आहात की नाही हे तपासून पाहू शकता.(फोटो सौजन्य – istock)
Relationship Tips: प्रेम आहे, पण संवाद हरवतोय? नात्यातील स्पार्क पुन्हा जागवण्यासाठी करा या 5 गोष्टी
सगळ्यात पहिले म्हणजे समोरच्या व्यक्तीबाबत रागाची भावना संपूर्णतः नष्ट होणं. तुम्ही ज्या व्यक्तीपासून वेगळे झालात त्या व्यक्तीबाबत मनात कोणताही राग, जळफळाट, द्वेष वाटणं वा या व्यक्तीचा बदला घ्यायला हवं असं काहीही वाटणं पूर्णतः बंद होणं. तसंच त्यांनी तुमच्यासह भूतकाळात नक्की काय केलं याचा विचार तुम्हाला त्रासदायक वाटत नसेल तर तुम्ही पूर्णतः मुव्ह ऑन या नात्यातून झाला आहात. याचाच अर्थ समोरची व्यक्ती तुमच्या दृष्टीने चूक असली तरीही तुम्ही त्यांना मनापासून माफ केलंय.
View this post on Instagram
आपण ज्याच्यासह नात्यात होतो ती व्यक्ती आता नक्की काय करत आहे हे तुम्ही सोशल मीडियावर ढुंकूनही पाहत नाही अथवा तुमच्या मनातही ती गोष्ट येत नाही. ते कोणासोबत आहेत, कोणासह फिरतायत हे तुम्हाला बघावंही वाटत नाही वा त्यांची आठवणही तुमच्या मनात येऊन तुम्ही त्यांना कधीच स्टॉक करत नाही. म्हणजेच त्यांचा कोणताही प्रेझेन्स तुमच्या मनावर परिणाम करत नाही
कोणत्याही नात्यातील आठवणी या महत्त्वाच्या असतात. त्या मनातून कधीच जात नाही. पण आता त्या आठवणींनी त्रास होत नाही आणि डोळ्यातून पाणी वाहत नाही. कारण त्या गोष्टीच आता आयुष्यात बरंच काही शिकवून गेल्या असून तुम्ही त्याकडे तटस्थ म्हणून पाहत असाल तर तुम्ही नक्कीच या नात्यातून बरंच पुढे निघून आला आहात.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःचा आनंद शोधणं, स्वतःला प्राधान्य देणं आणि करिअरकडे लक्ष देणं अर्थात सेल्फ लव्ह तुम्हाला महत्त्वाचं वाटतं. कुठेही स्वतःला बंदिस्त न ठेवता बिनधास्त जगायला तुम्ही शिकता आणि तेच तुमच्या जगण्यासाठी महत्त्वाचं असतं.
कोणत्याही माणसांबाबत आकस न बाळगता वेगळ्या माणसांना भेटायला आणि पुन्हा नव्याने जगायला तुम्ही तयार होता. मागच्या नात्यातील व्यक्तीची तुलना न करता पुन्हा प्रेमासाठी आणि नव्या नात्यासाठी तयार असता तेव्हा तुम्ही पूर्णतः यातून बाहेर आला आहेत हे कन्फर्म होते. म्हणजेच जुन्या नात्याची भीती नव्या नात्यात अडचण होत नाही.
पहिल्या डेटवर चुकूनही करू नका या 5 गोष्टी; Relationship Coach ने दिला सल्ला
तुम्हाला जर कळत नसेल की, आपण मुव्ह ऑन झालोय की नाही, तर आम्ही सांगितलेले हे ५ संकेत तुमच्या वागण्याशी जुळतात की नाही पहा.
Ans: जुन्या नात्याच्या आठवणी आल्या तरी पूर्वीसारखी तीव्र भावनिक अस्वस्थता जाणवत नाही, Ex च्या आयुष्याबद्दल सतत विचार करण्याची गरज वाटत नाही आणि स्वतःच्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करता येतेजुन्या नात्याच्या आठवणी आल्या तरी पूर्वीसारखी तीव्र भावनिक अस्वस्थता जाणवत नाही, Ex च्या आयुष्याबद्दल सतत विचार करण्याची गरज वाटत नाही आणि स्वतःच्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करता येते.
Ans: असे आवश्यक नाही. एखाद्या व्यक्तीची आठवण येणे स्वाभाविक आहे. महत्त्वाचे म्हणजे त्या आठवणी तुमच्या दैनंदिन आयुष्यावर किती परिणाम करतात आणि तुम्ही वर्तमानात किती सहजपणे जगू शकता.
Ans: यासाठी ठरावीक कालावधी नसतो. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव आणि नातं वेगळं असल्याने काहींना कमी तर काहींना अधिक वेळ लागू शकतो. स्वतःला भावना समजून घेण्यासाठी वेळ देणे महत्त्वाचे आहे.






