Bajra Khichdi Recipe : वाढते वजन आणि आरोग्याच्या समस्या पाहता आता अनेकजण पाैष्टिक खाद्यपदार्थांकडे वळू लागले आहेत. हेल्दी पदार्थ टेस्टीही असू शकतात याची जाणीव तुम्हाला ही रेसिपी चाखल्यावर होईल.
(फोटो सौजन्य: Pinterest)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
तांदळापासून बनवलेला खिचडी भात आपण खाल्ला आहे.
पण फार कमी लोकांना ठाऊक आहे की बाजरीपासूनही गरमा गरम खिचडी तयार केली जाऊ शकते.
ही खिचडी चवीला मजेदार आणि आरोग्याला पाैष्टिक ठरते.
पावसाळ्यात किंवा थंड वातावरणात गरमागरम आणि पौष्टिक पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी बाजरीची खिचडी हा घरच्या घरी सहज बनवता येणारा उत्तम पर्याय आहे. बाजरीमध्ये तंतुमय पदार्थ, लोह आणि इतर पोषक घटक असतात. बाजरीसोबत मूगडाळ आणि भाज्यांचा वापर केल्याने खिचडी अधिक पौष्टिक आणि पोटभर होते. रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नसल्यास तुम्ही ही हेल्दी बाजरीची खिचडी तयार करू शकता. कमी तेलात तयार होणारी ही खिचडी दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठीही योग्य आहे. दही, लोणचे किंवा तुपासोबत गरमागरम बाजरीची खिचडी सर्व्ह करता येते. चला रेसिपीनोट करुन घेऊयात.
बाजरी निवडून स्वच्छ धुवून घ्या. मूगडाळही धुऊन दोन्ही साधारण ३० मिनिटे पाण्यात भिजत ठेवा.
कुकरमध्ये तूप किंवा तेल गरम करून त्यात जिरे आणि हिरवी मिरची घाला.
त्यानंतर आले-लसूण पेस्ट टाकून हलके परता.
त्यात चिरलेला कांदा घालून तो मऊ आणि किंचित सोनेरी होईपर्यंत परता. नंतर टोमॅटो घालून तो नरम होऊ द्या.
हळद, लाल तिखट आणि मीठ घालून सर्व साहित्य व्यवस्थित मिसळा. मसाले जळणार नाहीत याची काळजी घ्या.
भिजवलेली बाजरी आणि मूगडाळ पाणी काढून कुकरमध्ये घाला. मसाल्यांसोबत एक-दोन मिनिटे परतून घ्या.
त्यात ४ ते ५ कप पाणी घालून मिश्रण एकत्र करा. कुकरचे झाकण लावून मध्यम आचेवर साधारण ४ ते ५ शिट्ट्या होऊ द्या.
कुकरचा प्रेशर पूर्णपणे निघाल्यानंतर झाकण उघडा आणि खिचडी हलक्या हाताने ढवळा. गरज असल्यास थोडे
गरम पाणी घालून पुन्हा एक उकळी द्या. वरून कोथिंबीर घालून गरमागरम बाजरीची खिचडी लोणच किंवा तुपासोबत सर्व्ह करा.
Web Title: Healthy and tasty bajra khichdi recipe in marathi