

राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे थंड वातावरण आहे. थंडीच्या दिवसांमध्ये शरीरातील उष्णता कायम टिकवून ठेवण्यासाठी आहारात वेगवेगळे पदार्थ खाण्याचा सल्ला कायमच दिला जातो. त्यातील अतिशय गुणकारी पदार्थ म्हणजे बाजरी. रोजच्या जेवणात अनेक घरांमध्ये बाजरीच्या भाकरीचा समावेश केला जातो. थंडीच्या दिवसांमध्ये खूप हालचाल होते, ज्याच्या परिणामामुळे खाल्लेले अन्नपदार्थ पचन होत नाहीत आणि पचनसंस्थेवर जास्तीचा तणाव येतो. सकाळच्या नाश्त्यात आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा बाजरीचे सूप बनवून प्यायल्यास फायबर पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करते. बाजरीमध्ये असलेल्या फायबरमुळे बद्धकोष्ठता आणि अपचनाच्या समस्या उद्भवत नाहीत. इतर पदार्थांच्या तुलनेमध्ये बाजरी पचायला अतिशय हलकी आहे. चला तर जाणून घेऊया बाजरीचे सूप बनवण्याची सोपी रेसिपी.
साहित्य:
तूप
कांदा
हिरवी मिरची
लसूण
आलं
गाजर
मटार
फरसबी
पालक
बाजरीचे पीठ
पाणी
मीठ
काळीमिरी पावडर
कृती:
बाजरीचे सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम, भाज्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि मध्यम आकारात कापा. यामुळे लगेच शिजल्या जातील.
कढईमध्ये तूप गरम करून त्यात हिंग, आलं, लसूण लालसर होईपर्यंत भाजा.
त्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा घालून मंद आचेवर लालसर होईपर्यंत शिजवून घ्या.
त्यानंतर त्यात बारीक करून घेतलेल्या सर्व भाज्या घाला आणि मंद आचेवर शिजण्यासाठी ठेवा.
भाज्यांना एक वाफ आल्यानंतर त्यात पालक पेस्ट आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून सूपला उकळी काढा.
सूपला एक उकळी आल्यानंतर त्यात चमचाभर बाजरीच्या पिठाची पेस्ट घालून मंद आचेवर शिजवा.
सूप घट्टसर झाल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ आणि काळीमिरी पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा.
तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले गरमागरम बाजरीचे सूप. हा पदार्थ घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.