Amla Soup: हिवाळ्यात प्या गरमागरम चटपटीत आवळ्याचे सूप, रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासोबतच त्वचेला मिळेल भरपूर पोषण
Amla Soup Recipep: वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन जाते. शरीरातील ऊब कायम टिकवून ठेवण्यासाठी आहारात वेगवेगळे पदार्थ खाल्ले जातात. हिवाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणावर आवळे उपलब्ध होतात. आवळ्याच्या सेवनामुळे शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि शरीराला आवश्यक पोषण मिळते. आवळ्यामध्ये विटामिन ‘सी’ आणि अँटीऑक्सिडंट्सयुक्त घटक असतात. ज्याच्या परिणामामुळे हानिकारक पेशींपासून शरीराचे नुकसान होत नाही. आवळ्यापासून नेहमीच चटणी, लोणचे किंवा मुरंबा इत्यादी ठराविक पदार्थाचं बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला आवळ्याचे सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे सूप बनवल्यानंतर शरीराला पोषण मिळते आणि सर्दी, खोकल्यापासून सुटका मिळते. चला तर जाणून घेऊया आवळ्याचे सूप बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – AI)
Food Recipe: दहा मिनिटात आणि कमी तेलाचा वापर करून बनवा एक आरोग्यदायी आणि स्वादिष्ट रेसिपी






