Recipe : चीजी पनीर ब्रेड रोल हा एक असा पदार्थ आहे जो पाहता क्षणीच तोंडाला पाणी आणतो. ही रेसिपी घरातील सर्वांनाच विशेषत: लहान मुलांच्या पसंतीस पडेल. काही हटके आणि टेस्टी बनवायचे असल्यास ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे.
(फोटो सौजन्य: Pinterest)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
आज आपण चीजी पनीर ब्रेड रोल रेसिपी जाणून घेत आहोत.
ही रेसिपी लहान मुलांना नक्कीच आवडेल.
पार्टी स्नॅक्ससाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरेल.
संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी चटपटीत आणि कुरकुरीत खाण्याची इच्छा झाली की चिजी पनीर ब्रेड रोल हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. चीज म्हणजे लहान मुलांचा आवडीचा पदार्थ. कोणत्याही पदार्थात तुम्ही चीज घातले की तो पदार्थ लहान मुलांनी खाल्लाच अस समजा. घरातील साध्या पदार्थांपासून झटपट तयार होणारा हा स्नॅक बाहेरून खमंग आणि क्रिस्पी, तर आतून मऊ, मसालेदार आणि चीज़ी लागतो. मुलांच्या टिफिनसाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठीही ही रेसिपीकरून पाहता येईल. चला यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.
सर्वप्रथम पनीर हाताने किंवा काट्याच्या मदतीने व्यवस्थित कुस्करून घ्या. त्यामध्ये किसलेले चीज, बारीक चिरलेली हिरवी मिरची, आले, कांदा आणि कोथिंबीर घाला. त्यानंतर ओरेगॅनो, चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ टाकून सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत नीट मिसळा. पनीरचे स्वादिष्ट आणि चीज़ी स्टफिंग तयार आहे.
आता ब्रेडच्या स्लाइसचे चारही कडे चाकूने कापून काढा. यामुळे ब्रेडला सहज आकार देता येतो आणि रोल व्यवस्थित बंद करता येतो. कडे राहिल्यास ब्रेड नीट सील न होण्याची शक्यता असते.
एक ब्रेड स्लाइस घ्या आणि दोन्ही बाजूंनी हलकेच पाण्यात भिजवा. लगेच तो स्लाइस दोन्ही हातांच्या तळव्यांमध्ये ठेवून त्यातील अतिरिक्त पाणी अलगद दाबून काढा. ब्रेड पूर्णपणे सपाट आणि मऊ झाला पाहिजे. मात्र तो जास्त वेळ पाण्यात ठेवू नका, अन्यथा ब्रेड फाटू शकतो.
आता तयार केलेले पनीर-चीज स्टफिंग थोडे घ्या आणि हाताने घट्ट एकत्र करून ब्रेडच्या मध्यभागी ठेवा. ब्रेडच्या कडा एकमेकांकडे आणत स्टफिंग पूर्णपणे झाकून टाका. हाताच्या तळव्याने हलकेच दाब देत रोलला अंडाकृती किंवा गोलाकार आकार द्या.
रोल तयार करताना त्यावर कुठेही भेग किंवा उघडी जागा राहणार नाही याची विशेष काळजी घ्या. सर्व रोल याच पद्धतीने तयार करून बाजूला ठेवा.
कढईमध्ये पुरेसे तेल घेऊन ते मध्यम-तेज आचेवर गरम करा. तेल तापल्यानंतर एकावेळी ३ ते ४ रोल सावधपणे तेलात सोडा. रोल बाहेरून कुरकुरीत आणि सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्या. तळताना सतत उलटापालटा करू नका, त्यामुळे रोल फुटण्याची शक्यता कमी राहते.
तळलेले पनीर ब्रेड रोल टिश्यू पेपरवर काढून अतिरिक्त तेल निथळू द्या. गरमागरम रोल टोमॅटो सॉस, हिरवी चटणी, टोमॅटो सॉस किंवा तुमच्या आवडीच्या डिपसोबत सर्व्ह करा.
Web Title: Make tasty and cheesy paneer bread roll at home note the recipe in marathi