Navratri Fast: उपवासाच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यात प्या टेस्टी राजगिऱ्याची स्मूदी, दिवसभर शरीरात टिकून राहील ऊर्जा
Navratri Fast: नवरात्री उत्सवाला सुरुवात झाल्यानंतर सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते. नऊ दिवस देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. याशिवाय महिलांसह पुरुषसुद्धा उपवास करतात. उपवासाच्या दिवसांमध्ये सकाळच्या नाश्त्यात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, बऱ्याचदा सुचत नाही. कायमच तेलकट किंवा साबुदाणा खिचडी खाल्ल्यामुळे पचनाच्या समस्या वाढण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे उपवासाच्यादिवशी सहज पचन होणाऱ्या अतिशय हलक्या पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला झटपट तयार होणारी राजगिरा स्मूदी बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली स्मूदी चवीला अतिशय सुंदर लागते. नऊ दिवसांच्या उपवासामध्ये शरीरातील ऊर्जा कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे सहज पचन होणाऱ्या आणि शरीराला ऊर्जा देणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया राजगिऱ्याची स्मूदी बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)






