अपयशाने खचलेल्या लोकांना मिळेल आत्मविश्वासचे बळ, 'हे' मोटिव्हेशनल कोट्स नक्की वाचा
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असंख्य चढ उतार येतात. कठीण प्रसंगात बाळगलेला संयम आणि शांतता जीवन जगण्यासाठी फार महत्वाची असते. आयुष्यात अनेक संकट येतात, त्या संकटाना सामोरे जाऊन त्यातून मार्ग काढणे आवश्यक आहे. याशिवाय स्वतःवर असलेला आत्मविश्वास सोप्या गोष्टी सुध्दा एखाद्यासाठी बनवू शकतो किंवा एखाद्यसाठी अतिशय सोप्या सुद्धा बनवू शकतो. त्यामुळे जीवनात आलेल्या अपयशांमुळे माघार न घेता आत्मविश्वासाने त्यांना सामोरे जाणे फार आवश्यक आहे. त्यामुळे स्वतःवरील आत्मविश्वास वाढवण्यासाठी हे मराठमोळे सुविचार नक्की वाचा.(फोटो सौजन्य – istock)
प्रयत्न करणे म्हणजेच यशाच्या मार्गावर…! स्वप्नांना बळ देण्यासाठी …
आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो, विचार बदला आयुष्य बदलेल.
निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका, कारण आपलं ध्येय साध्य होताच, निंदा करणाऱ्यांची मतं बदलतात.
कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही, शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात, त्यांनाच यश प्राप्त होते.
काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे, तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात.
“धैर्य हे यशाचं बीज आहे, आत्मविश्वास म्हणजे त्याला घालणं योग्य पाणी.”
“जेव्हा कोणीही तुमच्यावर विश्वास ठेवत नाही, तेव्हा स्वतःवर ठाम राहा – हेच खरे यशाचे रहस्य आहे.”
“आत्मविश्वास सुविचार मराठी” हे लोकांना पुढे जाण्याचं बळ देतात. हे विचार केवळ मनाची ताकद वाढवत नाहीत, तर व्यक्तिमत्त्वही घडवतात.
कोकिळा स्वतःची भाषा बोलते म्हणून ती मुक्त आहे. परंतु पोपट दुसऱ्याची भाषा बोलतो म्हणून तो पिंजर्यात गुलाम बनून राहतो. म्हणून स्वतःची भाषा, स्वतःचे विचार आणि स्वतःवर विश्वास ठेवा.
जगणे निरर्थक म्हणतो तो बेइमान आहे, सुखासाठी कधी हसावं लागंत, तर कधी रडावं लागतं.. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं..
जितके अधिक जगण साजरं कराल तितके आयुष्य अधिक तुम्हाला साजर करण्यासाठी कारण देईल.
दुर्बल व्यक्ती एखादे उच्च ध्येय समोर ठेवून समाजात वावरु लागते तेव्हा धाडस व साहस हे गुण तिच्यात आपोआप येतात.
फक्त परिणामांकडे बघू नका, आपल्याला तेच मिळत ज्याचे आपण लायक आहोत.
“कधीही हार मानू नका कारण महान गोष्टींना वेळ लागतो.”
“मी नेहमीच स्वतःच्या बाहेर ताकद आणि आत्मविश्वास शोधत होतो पण ते आतून येते. ते नेहमीच असते.”
“तुम्ही पुरेसे नाही आहात. तुम्ही सर्वस्व आहात!”
Premanand Ji Mahararaj: कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने दिला धोका तर …
“फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. जरी तुम्ही तसे केले नाही तरी, तुम्ही तसे करत आहात असे भासवा आणि कधीतरी तुम्ही नक्कीच जिंकाल.”
“स्वतःला आव्हान द्या आणि भरभराटीसाठी दृढनिश्चय करा.”“तुम्हाला आत कसेही वाटत असले तरी, नेहमी विजेत्यासारखे दिसण्याचा प्रयत्न करा. तुम्ही मागे असलात तरीही, नियंत्रण आणि आत्मविश्वासाचा सततचा दृष्टिकोन तुम्हाला मानसिक धार देऊ शकतो ज्यामुळे विजय मिळू शकतो.”






