उन्हाळ्यात दिवसभर येणाऱ्या घामामुळे कंटाळा आहात? घामाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी 'या' पद्धतीने करा तुरटीचा वापर
वर्षाच्या बाराही महिने शरीराला घाम येतो. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक घामावाटे बाहेर पडून जातात. उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर नेहमी पेक्षा खूप जास्त घाम येतो. सतत येणाऱ्या घामामुळे अंग चिकट झाल्यासारखे वाटते आणि काखेत घामाची खूप जास्त दुर्गंधी येते. घामाच्या दुर्गंधीमुळे काहीवेळा महिलांचा आत्मविश्वास कमी होऊन जाते. ट्रेन किंवा रिक्षामधून फिरताना घामामुळे कपडे खूप जास्त ओले होऊन जातात. काहीवेळा सतत येणाऱ्या घामामुळे काखेत घाणीचा चिकट थर जमा होतो आणि काख पूर्णपणे काळी दिसू लागते. काखेत वाढलेला काळेपण कमी करण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. घामाची दुर्गंधी घालवण्यासाठी महागडे डीओ किंवा परफ्यूम वापरले जातात, पण याचा सुगंध जास्त वेळ टिकून राहत नाही. तसेच केमिकल युक्त डीओ किंवा परफ्यूमचा वापर केल्यामुळे त्वचेचे नुकसान होण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात सतत येणाऱ्या घामापासून सुटका मिळवण्यासाठी तुरटीचा वापर कशा पद्धतीने करावा, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)
प्रत्येक घरात कायमच तुरटी उपलब्ध होते. तुरटीचा वापर केल्यामुळे पाण्यातील विषाणू नष्ट होतात. त्याप्रमाणे त्वचा आणि शरीरासाठी सुद्धा केला जातो. तुरटीमध्ये सल्फर नावाचे घटक असते. सल्फरमध्ये बॅक्टेरिया नष्ट करण्याची क्षमता असते. त्यामुळे तुरटीचा वापर करावा. काखेत वाढलेला काळेपणा कमी करण्यासाठी तुरटीचा वापर करावा. यासाठी अंघोळ करताना तुरटी पाण्यात भिजवून काखेत लावावी. आठवडाभर नियमित काखेत तुरटी लावल्यामुळे काळेपणा कमी होण्यास मदत होईल. यामुळे दिवसभरात सतत येणाऱ्या घामाच्या धारा नियंत्रणात राहण्यास मदत होते. उन्हाळ्यात सतत घाम येत असल्यास अंघोळीच्या पाण्यात तुरटी मिक्स करून अंघोळ करावी.
तुरटी काखेत किंवा मानेवर वाढलेला काळेपणा कमी करण्यासाठी सुद्धा फार महत्वाचे ठरते. मानेवर वाढलेला काळेपणा कमी करण्यासाठी दोन आठवड्यांपर्यंत मानेवर तुरटी लावावी. तुरटी लावून हलक्या हाताने मसाज करून नंतर पाण्याने त्वचा स्वच्छ करून घ्या. तुरटीमध्ये असलेले पोटॅशिअम आणि अॅल्यूमिनिअम युक्त घटक आढळून येतात. यामुळे शरीर स्वच्छ होते.
काखेत वाढलेले काळे डाग कमी करण्यासाठी तुरटीचा फेसपॅक बनवून लावावा. यासाठी वाटीमध्ये तुरटी पावडर घेऊन त्यात लिंबाचा रस मिक्स करा. तयार केलेला फेसपॅक संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसेच ठेवा. यामुळे काळे डाग कमी होण्यासोबतच पिंपल्समधील घाण स्वच्छ होण्यास मदत होते. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा तुरटीचा फेसपॅक लावल्यास त्वचा उजळदार होईल. तुरटी लावल्यानंतर चेहरा कोरडा पडण्याची शक्यता असते.






