साप्ताहिक राशीभविष्य १२ डिसेंबर ते १८ डिसेंबर २०२१; ‘या’ राशीच्या लोकांवर चालू आठवड्यात चोरीचा आरोप लागू शकतो. पोलिस स्टेशनच्या भानगडीही पाठीमागे लागू शकतात. वाद टाळण्यासाठी भगवान शंकरांची उपासना करावी.

Add a heading (32)
Published on: 
Updated on: 

मेष (Aries) :

स्वछंदीपणे दिवस घालवाल. आपल्या आजच्या सर्व इच्छा पूर्ण करून घ्याल. बाहेरील परिस्थितीचा अंदाज घेऊन खरेदी कराल. घरातील गोष्टींसाठी वेळ द्यावा. समोरील प्रत्येक गोष्टीत रमून जाल. आजच्या दिवसाची सुरूवात चांगली राहील. आई-वडिलांचं प्रेम मिळेल. मुलांकडून सुख मिळेल. धनलाभ होणार.

वृषभ (Taurus) :

रेस, जुगार यातून लाभ संभवतो. मित्रांशी मनमोकळ्या गप्पा माराल. छंद जोपासायला वेळ काढाल. आवडत्या साहित्यात रमून जाल. कौटुंबिक सौख्याला अधिक प्राधान्य द्याल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. काम काज उत्तम सुरू राहतील. धनलाभ होईल मात्र अचानक खर्च देखील वाढतील.

मिथुन (Gemini) :

घरगुती जबाबदारी उत्तमरीत्या पेलाल. जवळचा प्रवास सुखकर होईल. काही खर्च अनाठायी होऊ शकतात. कामात भावंडे सहकार्य करतील. केलेल्या कष्टाचे समाधान मिळेल. चालू आठवडा खूप तणावाचा असेल. आज तुमच्या स्वभावात गंभीरपणा आणि एकाग्रता याची झलक दिसेल.

कर्क (Cancer) :

कौटुंबिक गोष्टीत अधिक वेळ जाईल. एखाद्या क्षुल्लक गोष्टीसाठी अडून राहू नका. वयस्कर व्यक्तींचा मान राखाल. पैशाचा अपव्यय टाळावा. खोट्या गोष्टींना भुलू नका. चालू आठवडा तुमच्यासाठी चांगला असेल. आज कोणतंही कार्य केलंत तरी तुम्हाला मदत मिळेल. पण मेहनत आणि अथक प्रयत्न आज करावे लागतील. ‘या’ राशीच्या लोकांवर चालू आठवड्यात चोरीचा आरोप लागू शकतो. पोलिस स्टेशनच्या भानगडीही पाठीमागे लागू शकतात.

सिंह (Leo) :

दिवस आपल्या मनाप्रमाणे व्यतीत करावा. आवडत्या गोष्टीत अधिक रमून जाल. कमीपणा घ्यायला घाबरू नका. मानापमानाच्या प्रसंगातून जावे लागू शकते. नवीन मित्र जोडले जातील. विद्यार्थ्यांनी बुद्धिमत्ता आणि योग्यतेच्या आधारावर आज यश मिळेल. कुटुंबासोबत चांगला दिवस घालवाल. चालू आठवडा तुमच्यासाठी उत्तम असेल. वाद टाळण्यासाठी भगवान शंकरांची उपासना करावी.

कन्या (Virgo) :

विचारांच्या गर्दीत भरकटू नका. कामाची योग्य दिशा ठरवा. कल्पनेत रमून जाऊ नका. कृतीला अधिक महत्त्व द्यावे. बोलतांना तारतम्य बाळगा. कामात यश मिळेल. मूड चांगला असेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.

तूळ (Libra) :

चांगला व्यावसायिक लाभ होईल. आपली आजची आर्थिक गरज पूर्ण होईल. मनातील इच्छा पूर्ण होईल. अपेक्षित लाभाने समाधान मिळेल. व्यावसायिक दर्जा सुधारेल. दिवसाची सुरूवात खूपच चांगली होईल. कामात धनलाभ होईल. वैवाहिक जीवन चांगल असेल. जोडीदारासोबत चांगले संबंध राहतील.

वृश्चिक (Scorpio) :

नोकरीच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. कर्तुत्वाला वाव देता येईल. वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. व्यापारी वर्गाला नवीन धोरण आखता येईल. सन्मानाने भारावून जाल. आजच्या दिवसाची सुरूवात चांगल्या गोष्टीने होऊ शकते. कामात धनलाभ होईल. धनाचा संचय देखील करू शकता. मंगळवारचा संपूर्ण दिवस उत्सवाचा असेल.

धनू (Sagittarius) :

तरुणांचे नवीन विचार जाणून घ्या. नातेवाईकांची नाराजी दूर करावी लागेल. दैनंदिन कामात थोडा बदल करून पाहावा. सबुरीच्या मार्गाने समोरील प्रश्न हाताळा. आईचे उत्तम सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांना आपल्या करिअरमध्ये यश प्राप्त होईल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. एकमेकांसोबत चांगला वेळ घालवाल. चालू आठवडा आत्मविश्वासाने भरलेला असेल.

आजचा शुभ रंग आणि अंक : लाल, 7

मकर (Capricorn) :

जोडीदाराची प्राप्ती वाढेल. पण त्याबरोबरच एकमेकांना समजून घ्यावे लागेल. वैचारिक मतभेदाला बाजूला ठेवावे. काम आणि वेळ यांचा योग्य मेळ घालावा. अचानक धनलाभाची शक्यता. कार्यात सफलता प्राप्त होईल. नोकरदार वर्गाकरता चालू आठवडा महत्वाचा ठरेल.

कुंभ (Aquarius) :

अति आवश्यक असेल तरच बाहेर पडावे. जोडीदाराचा वरचष्मा राहील. भागीदारीत मतभेद संभवतात. संपर्कातील लोकांशी घनिष्ठता वाढेल. घरगुती वातावरण प्रसन्न राहील. कामात चालू आठवडा असेल. साहस आणि आत्मविश्वास हे महत्वाचं ठरणार आहे. जोडीदार आणि कुटुंबाकडून तुम्हाला चांगली साथ मिळेल. धनलाभ होणार.

मीन (Pisces) :

आततायीपणे वागून चालणार नाही. कामातून समाधान लाभेल. हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल. मुलांच्या वागण्याचा अचंबा वाटेल. हातातील कलागुण विकसित करावेत. चतुराईचा चालू आठवडा आहे.