बुलढाण्यात आरोग्यसेवेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड! शासकीय रुग्णालयात रोबोटिक सर्जरी युनिट सुरू होणार

First Robotic Surgery Units Facility Buldhana: बुलढाण्यातील राजमाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाच रोबोटिक सर्जरी युनिट दाखल झाले आहे. या सुविधेमुळे जिल्ह्यातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
First Robotic Surgery Units Facility Buldhana
First Robotic Surgery Units Facility BuldhanaPhoto- AI
Published on: 
Updated on: 
  • बुलढाण्यात आरोग्य क्रांतीची नवी सुरुवात

  • रोबोटिक सर्जरी युनिटचे लोकार्पण

  • पाच रोबोटिक युनिट दाखल

बुलढाणा: वैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आता बुलढाणा जिल्ह्यातल्या रुग्णांसाठीही उपलब्ध होणार आहे. राजमाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बुलढाणा येथे शनिवारी दुपारी २ वाजता रोबोटिक सर्जरी युनिटचे उ‌द्घाटन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रताप जाधव यांच्या हस्ते होणार आहे.

या अत्याधुनिक आरोग्य सुविधेसाठी बुलढाणा येथे पाच रोबोटिक युनिट दाखल झाले आहे. याशिवाय, उद्घाटनाच्या दिवशीच पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्याच्या शासकीय आरोग्य सेवेला आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाची जोड मिलणार आहे.

केंद्रीय राज्यमंत्री प्रताप जाधव यांच्या प्रयत्नांमुळे मुंबई, नागपूर, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांनंतर आता बुलढाणा येथेही रोबोटिक शखक्रियेची सुविधा उपलब्ध होत आहे. या सुविधेमुळे बुलढाणा जिल्ह्यासह परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक शस्त्रक्रिया तंत्रज्ञानाचा लाभ स्थानिक स्तरावर मिळणार आहे. परिणामी, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी मोठ्या शहरांमध्ये जाण्याची रुग्णांची गरज कमी होण्यास मदत होणार आहे.

First Robotic Surgery Units Facility Buldhana
kamathipura: कामाठीपुरा बदलणार! पुनर्विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणीला वेग, नोंदणी केंद्र सुरू

रोबोटिक सर्जरी हे आधुनिक वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण प्रगती आहे. या पद्धतीत रोबोट स्वतःहून शस्त्रक्रिया करत नाही, तर प्रशिक्षित कुशल शल्यचिकित्सक विशेष नियंत्रण प्रणालीच्या साहाय्याने रोबोटिक उपकरणे हाताळतात. या तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रियेदरम्यान अधिक अचूकता, उत्तम नियंत्रण आणि सूक्ष्म हालचाली साधणे शक्य होते.

विशेषतः शरीराच्या नाजूक आणि गुंतागुंतीच्या भागांवरील शस्त्रक्रियांसाठी ही पद्धत उपयुक्त ठरते. काही शस्त्रक्रियांमध्ये, पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत कमी रक्तस्राव, लहान छेद, कमी वेदना आणि संसर्गाचा धोका कमी होऊ शकतो. यामुळे रुग्णाला लवकर बरे होण्यास आणि रुग्णालयातील मुक्कामाचा कालावधी कमी करण्यास मदत होऊ शकते. परिणामी, अत्याधुनिक शस्त्रक्रियांसाठी मोठ्या शहरांवर अवलंबून राहण्याची गरजही काही प्रमाणात कमी होऊ शकते.

जिल्ह्यातील रुग्णांना अत्याधुनिक उपचारांचा होणार लाभ

राजमाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रोबोटिक सर्जरी यूनिट सुरू झाल्यामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या आरोग्य सुविधांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची भर पडणार आहे. शासकीय वैद्यकीय संस्थेत ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया सुविधा उपलब् झाल्याने सामान्य रुग्णांनाही या तंत्रज्ञानाचा लाभ मिळण्याची संधी निर्माण होणार आहे.

First Robotic Surgery Units Facility Buldhana
Shevgaon Water Issue : शेवगावच्या हक्काचा एक थेंबही पाणी बाहेर जाऊ देणार नाही! ​ॲड. शिवाजीराव काकडेंचा प्रशासनाला खणखणीत इशारा