बुलडाणा: नागपूरहून पुण्याकडे निघालेल्या खासगी लक्झरी बसला सिंदखेडराजा पिंपळखुटा भागात (Buldana Bus Accident) समृध्दी महामार्गावर (Samrudhhi Highway) भीषण अपघात झालाय. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून यामुळे समृद्धी महामार्गावरील खासगी वाहनांच्या वेगमर्यादेचा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत राज्य सरकारने गंभीर दखल घेत त्वरित उपाययोजना करायला हव्यात. अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. तर, अपघातातील मृतांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली तर, सुप्रिया सुळे यांनी घटनेबद्दला दुख: व्यक्त केलं असून त्यांनी वाहनांच्या वेगमर्यादेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
[read_also content=”मोठी बातमी! समृद्धी महामार्गावर बुलढाण्यात बस आणि ट्रॅव्हल्सचा अपघात; 25 प्रवाशी होरपळून ठार, तर 8 प्रवाशी गंभीर जखमी, बचावकार्य सुरु… https://www.navarashtra.com/maharashtra/bus-and-travels-accident-in-buldhana-on-samriddhi-highway-twenty-five-passengers-were-killed-while-eight-passengers-were-seriously-injured-rescue-operation-started-425733.html”]
या दुर्दैवी घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील खासगी वाहनांच्या वेगमर्यादेचा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत राज्य सरकारने गंभीर दखल घेत त्वरित उपाययोजना करायला हव्यात. एक आठवड्यापूर्वीच संबंधित विभागाकडून होत असलेल्या अपघातांची आकडेवारी मागवून चिंता व्यक्त केली होती. अपघात रोखन्याच्या दृष्टीने तातडीच्या उपाययोजना कराव्यात असे सुचवले होते. असही ते म्हणाले.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा पिंपळखुटा भागात समृध्दी महामार्गावर लक्झरी बस उलटून भीषण अपघात झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या अपघातात 25 प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. अपघातातील जखमींवर लवकरात लवकर उपचार होऊन ते बरे व्हावेत ही प्रार्थना.… — Sharad Pawar (@PawarSpeaks) July 1, 2023
ही बातमी अतिशय दुर्दैवी आणि दुःखदायक आहे. या घटनेतील जखमींवर उपचार सुरु असून ते सुखरुप घरी परत यावे ही ईश्वरचरणी प्रार्थना. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली असं सुप्रिया सुळे यांनी म्हण्टलयं.
— Supriya Sule (@supriya_sule) July 1, 2023
या भीषण दुर्घटनेनंतर समृध्दी महामार्गावरील वाहनांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राज्य शासनानं तज्ञांच्या सल्ल्यानं यावर तत्काळ उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. आजच्या भीषण बस दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या प्रवाशांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. असं ट्विट अजित पवार यांनी केलं आहे.
नागपूरहून पुण्याला येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसला समृध्दी महामार्गावर बुलढाणा – सिंदखेडराजा येथे अपघात होऊन २५ हून अधिक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद, वेदनादायी आहे. समृध्दी महामार्गावर बसचा टायर फुटल्यानं बस दुभाजक व खांबाला धडकली आणि बसनं पेट घेतला. या… — Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 1, 2023
ही घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला वेदना देणारी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. असंं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 1, 2023
ही घटना अत्यंत दुर्दैवी, वेदनादायी व दु:खद आहे. अपघातातील मृतांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. जखमी लवकरात लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना करतो. असं नितीन गडकरी यांनी म्हण्टलय.
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) July 1, 2023






