भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्पेनचे प्रधानमंत्री पेड्रो सांचेझ यांच्यात चांगले संबंध आहेत. यामुळे दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत होत आहे, असे स्पेनचे राजदूत म्हणाले.
मंत्री बावनकुळे यांनी एका अधिकाऱ्याच्या डेस्क ड्रॉवरमध्ये लपवून ठेवलेली रोकड जप्त केली. भ्रष्टाचाराच्या तक्रारींना या घटनेमुळे पुष्टी मिळाल्याचे स्पष्ट झाले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने महानगरपालिका क्षेत्रातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसाठी दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित केली आहे.
यंदाचा विजयादशमीचा उत्सव राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी विशेष आहे. यंदा संघाला 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. 1925 मध्ये डॉ. केशव बळिराम हेडगेवार यांनी स्थापन केलेल्या संघटनेला 100 वर्षे पूर्ण झाली आहेत.
कामठीतील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेंपल येथे ६९ व्या धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त बुधवार १ ऑक्टोबरपासून दोन दिवसीय धम्मचक्र महोत्सव आयोजीत करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
सामाजिक न्याय विभाग परिसरात ठेवण्यात आलेल्या मोबाईल टॉयलेट्स बाबत आंबेडकरी चळवळीतील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. हे ठिकाण अनेक वर्षांपासून श्रद्धास्थान असून येथे देशभरातून अनुयायी येतात.
सक्करदरा परिसरात चेन स्नॅचिंग करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून या तपासातून आणखी दोन गुन्ह्यांची उकल झाली आहे. गुन्हे शाखेच्या सोनसाखळी विरोधी पथकाने ही धडक कारवाई केली आहे.
महाजेनको कंपनीने भाडे कराराने दिलेली जागा मौजा कोराडी, मौजा महादुला, मौजा खापरखेड़ा, मौजा नांदा (तालुका कामठी) आणि मौजा घोगली ता. नागपूर (ग्रामीण) या भागात व्यापलेली आहे. ही जमिन नैसर्गिक संसाधनांच्या…
Nagpur मध्ये बबनराव तायवाडे यांनी भुजबळ मेळाव्याचं स्वागत करत ओबीसी आरक्षणाबाबत गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन केले. मराठा समाजातील आणि ओबीसी समाजातील नागरिकांना धैर्य ठेवण्याचे आवाहन केले.
नगरधनचा आठवडी बाजारात भाजी विक्रेत्याच्या दुकानासमोर उभा असताना एका तरुणाचा चुकून गरम तेलाच्या कढईत पडल्याने एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.ही दुर्दैवी घटना शनिवारी झालेल्या साप्तहिक बाजारात घडली.
नागपुरातून एक चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अज्ञात आरोपीने चक्क पार्सल देण्याच्या बहाण्याने एका महिलेच्या घरात प्रवेश केला आणि तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून फरार झाला.
नागपूरमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका व्यापाऱ्याला गोळीबार करत दरोडेखोरांनी लुटल्याचे समोर आले आहे. या घटनेत व्यापारी जखमी झाला आहे. ही घटना नागपूरच्या कडबी चौकात भर रस्त्यावर बुधवारी…
नागपूरमध्ये दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर आज भाविकांच्या गर्दीत आणि ढोल-ताशांच्या गजरात ‘नागपूरचा राजा’ महाल गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झाला. जयघोष, फुलांची उधळण आणि भक्तीमय वातावरणात हजारो नागपूरकरांनी बाप्पांना निरोप
OBC Reservation: ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये तसेच त्यावर काही अडचण येऊ नये यासाठी ओबीसी समाज आंदोलन करत आहे. गेल्या काही दिवसांपासून उपराजधानी नागपूरमध्ये ओबीसी समाज आंदोलन करत आहे.
नागपूरच्या महामेट्रोने जगातील सर्वात लांब 'डबल डेकर' पुल बांधून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
Indigo bird strike flight: नागपूरहून कोलकाताकडे निघालेल्या इंडिगो विमानाला पक्षी धडकल्याने काही मिनिटांतच २७२ प्रवाशांना सुखरूप नागपूरला उतरवण्यात आले. या विमानाने आज सकाळी ७ वाजून ५ मिनिटाने उड्डाण घेतली होती.
Nitin Gadkari News : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नेते आणि मंत्र्यांना धार्मिक कार्यांपासून दूर ठेवण्याचा सल्ला दिला आहे. मंत्री आणि नेत्यांना धार्मिक कार्यापासून दूर ठेवा.
नागपूरच्या जयताला रोडवर एका धावत्या कारला अचानक आग लागली. वेळीच सावध झाल्याने हरीश पांडे आणि त्यांच्या कुटुंबाचा जीव वाचला. हा थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
सातनवरीचे समृद्ध गावाचे रोल मॉडेल उभारून लवकरच राज्याच्या प्रत्येक तालुक्यातील 10 गावे स्मार्ट व इंटेलिजंट करण्यत येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.