Vaishnavi Hagavane: मोठी बातमी! वैष्णवी आत्महत्या प्रकरण; सुशील, राजेंद्र हगवणेच्या पोलीस कोठडीत 'इतक्या' दिवसांची वाढ

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात कोर्टात आरोपींची बाजू मांडताना वकिलांनी गंभीर आरोप केले होते. वैष्णवीच्या चारित्र्यावर हगवणे कुटुंबाला संशय होता.
Vaishnavi Hagavane: मोठी बातमी! वैष्णवी आत्महत्या प्रकरण; सुशील, राजेंद्र हगवणेच्या पोलीस कोठडीत 'इतक्या' दिवसांची वाढ
सुशील आणि राजेंद्र हगवणे यांच्या कोठडीत वाढ (फोटो- सोशल मिडिया)
Published on: 
Updated on: 

पुणे: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. वैष्णवी आत्महत्या प्रकरणात सुशील हगवणे आणि राजेंद्र हगवणे यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. आज कोठडी संपल्याने त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात आले. दरम्यान कोर्टाने त्यांच्या कोठडीत वाढ केली आहे. सुशील आणि राजेंद्र हगवणे यांच्या पोलिस कोठडीत 3 जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान भारत-नेपाळ सीमेवरून नीलेश चव्हाणला अटक करण्यात आली होती . आज त्याला कोर्टासमोर पोलिसांनी हजर केला. दरम्यान नीलेश चव्हाणला देखील 3 जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे . या कालावधीत हगवणे कुटुंबीय आणि निलेश चव्हाणची चौकशी समोरासमोर होणार असल्याचे समोर येत आहे.

निलेश चव्हाणला पोलीस कोठडी

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण याला पोलीस कोठडी मिळाली आहे. त्याला ३ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश शिवाजीनगर न्यायालयाने दिले. शुक्रवारी पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याला नेपाळमध्ये अटक करुन पुण्यात आणले होते.

दरम्यान गेल्या 10 दिवसापासून फरार असलेल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील निलेश चव्हाणला नेपाळमधून बेड्या ठोकल्या आहेत. त्यानंतर आज (31 मे) त्याला कार्टात हजर करण्यात आलं होतं, त्यावेळी सरकारी वकिलांनी केलेल्या युक्तीवादानंतर कोर्टाने त्याला 3 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. वैष्णवीचं बाळ निलेशने कोणत्या अधिकरावर घेतलं, तसंच त्याच्याकडून पिस्तूल आणि मोबाईल डेटा जप्त करायचा आहे, यासाठी त्याची कोठडी पोलिसांनी मागून घेतली आहे.

हगवणे कुटुंबाशी काय संबंध?

मिळालेल्या माहितीनुसार, निलेश हा शशांक हगवणेची बहीण करिश्मा हगवणेचा मित्र असल्याचा आरोप आहे. तो शशांक आणि वैष्णवी यांच्यातील वादातही अनेकदा सहभागी असायचा. तो शशांकचा व्यावसायिक भागीदार असल्याचेही म्हटले जाते. तो अनेकदा कौटुंबिक वादात अडकत असे. निलेशचे हे वर्तन उघडकीस आल्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी सुनेला पाठिंबा देण्याऐवजी त्याचा छळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर कंटाळून निलेशची पत्नी घराबाहेर पडली. तिने पोलिसात तक्रार केली. या तक्रारीच्या आधारे २०२२ मध्ये निलेशविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर मुंबई उच्च न्यायालयाने निलेश चव्हाणला अटकपूर्व जामीन मंजूर केला. वैष्णवीचे कुटुंब मुलाचा ताबा घेण्यासाठी पोहोचले तेव्हा निलेश त्यांना पिस्तूल दाखवून धमकावत असे. या प्रकरणात पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे.