• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Jalna Accident News Eicher Tempo Hit Four People In Jalna Three Died

धक्कादायक! जालन्यात भरधाव टेम्पोची चौघांना धडक; चिमुकलीसह तिघांचा मृत्यू

जालना जिल्ह्यातील मंठा परिसरातील देवी रोड येथे एका टेम्पो चालकाने चौघांना धडक दिल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली आहे. या घटनेत एका लहान मुलीसह तिघांचा मृत्यू झाला असून एक लहान मुलगी जखमी झाली आहे. या अपघातानंतर टेम्पो चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 30, 2024 | 12:32 PM
फोटो सौजन्य- सोशल मिडीया

फोटो सौजन्य- सोशल मिडीया

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

जालन्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर येत आहे. जालन्यात एका भरधाव टेम्पोने चौघांना धडक दिल्याची घटना घडली आहे. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून एक लहान मुलगी गंभीर जखमी झाली आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांमध्ये एक महिला, लहान मुलगी आणि एका जेष्ठ नागरिकाचा समावेश आहे. आज सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. जालन्यातील मंठा परिसरात हा अपघात झाला. या अपघातानंतर टेम्पो चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे.

हेदेखील वाचा- राज्यात पावसाचा जोर ओसरला; रायगड आणि रत्नागिरीला आज हवामान विभागाचा यलो अलर्ट

जालना जिल्ह्यातील मंठा परिसरातील देवी रोड येथे एका टेम्पो चालकाने चौघांना धडक दिल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली आहे. या घटनेत एका लहान मुलीसह तिघांचा मृत्यू झाला असून एक लहान मुलगी जखमी झाली आहे. सीमा चव्हाण (वय २४), मारिया पठाण (वय ६) आणि रूपला राठोड (वय ६५) अशी या अपघातातील मृतांची नावं आहे. तर 4 वर्षांची चिमुकली इशिका चव्हाण या अपघातात जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघातानंतर नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. अपघातामुळे मार्गावर काही काळासाठी वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली होती.

हेदेखील वाचा- सहलीसाठी आलेल्या पर्यटकांची कार दरीत कोसळून भीषण अपघात; गाडीचा झाला चक्काचूर

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी चिमुकलीला उपचारासाठी रुग्णालायत दाखल केलं. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील मंठा शहरातील देवी रोडवर आज सकाळी एक महिला आपल्या मुलीला शाळेतून घरी घेऊन जात होती. यावेळी एक जेष्ठ नागरिक आणि सहा वर्षीय मुलगी देखील त्याच रस्त्याने जात होते. यावेळी या मार्गावरून येणाऱ्या एका भरधाव टेम्पोने या चौघांना जोरदार धडक दिली. या अपघातात सीमा चव्हाण (वय २४), मारिया पठाण (वय ६) आणि रूपला राठोड (वय ६५) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर चार वर्षाची चिमुकली इशिका चव्हाण गंभीर जखमी झाली आहे. या घटनेनंतर टेम्पो चालक फरार असून त्याचा शोध सुरु आहे. अपघातग्रस्त टेम्पो ताब्यात घेण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

जालन्यात बस आणि कारचा अपघात

जालन्यात बस आणि कारचा देखील भीषण अपघात झाला आहे. काल रात्री उशीरा हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. या अपघातात 10 जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जालना जिल्ह्यातील सिंदखेडराजा चौफुली येथे हा भीषण अपघात झाला. महाराष्ट्र परिवहन महामंडळाची बस हिंगोलीहून पुण्याच्या दिशेने जात होती. यावेळी सिंदखेडराजा चौफुलीजवळ पाठीमागून येणाऱ्या एका कारने बसला धडक दिली आणि बस उलटी झाली. या अपघातात बसमधील ६ प्रवासी आणि कारमधील ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Web Title: Jalna accident news eicher tempo hit four people in jalna three died

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2024 | 12:32 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Netanyahu चा गेम ओव्हर? इराणची इस्रायलच्या पंतप्रधानांना उडवण्याची धमकी; खामेनेईंच्या मृत्यूचा बदला घेणार

Netanyahu चा गेम ओव्हर? इराणची इस्रायलच्या पंतप्रधानांना उडवण्याची धमकी; खामेनेईंच्या मृत्यूचा बदला घेणार

Mar 01, 2026 | 11:54 AM
Iran Israel वादाचे भारतात पडसाद; खामेनेईच्या मृत्यूनंतर शेकडो शिया मुस्लीम रस्त्यावर, श्रीनगरमध्ये जोरदार निदर्शने

Iran Israel वादाचे भारतात पडसाद; खामेनेईच्या मृत्यूनंतर शेकडो शिया मुस्लीम रस्त्यावर, श्रीनगरमध्ये जोरदार निदर्शने

Mar 01, 2026 | 11:51 AM
ग्लॅमरच्या झगमगाटात नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस; ‘मोहिनी’ मालिकेत पाहायला मिळणार प्रेमाचा नवा संग्राम

ग्लॅमरच्या झगमगाटात नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस; ‘मोहिनी’ मालिकेत पाहायला मिळणार प्रेमाचा नवा संग्राम

Mar 01, 2026 | 11:49 AM
Operation Epic Fury: युद्ध नाही, हा तर विनाश! अमेरिकेच्या ‘Scorpion Strike’ने आकाशातून पाठवले मृत्यूदूत,पहा ‘हा’ थरारक VIRAL VIDEO

Operation Epic Fury: युद्ध नाही, हा तर विनाश! अमेरिकेच्या ‘Scorpion Strike’ने आकाशातून पाठवले मृत्यूदूत,पहा ‘हा’ थरारक VIRAL VIDEO

Mar 01, 2026 | 11:46 AM
पुण्याच्या ‘पाताळलोक’ प्रकल्पाचा मार्ग बदलणार; 32 हजार कोटींच्या भुयारी मार्गासाठी आता ‘सहा पर्यायांचा’ अभ्यास

पुण्याच्या ‘पाताळलोक’ प्रकल्पाचा मार्ग बदलणार; 32 हजार कोटींच्या भुयारी मार्गासाठी आता ‘सहा पर्यायांचा’ अभ्यास

Mar 01, 2026 | 11:45 AM
लग्नाचा बाजारच मांडला; गरजू तरुणांवर दलालांचा डोळा, फसवणूक केली लाखोंची…

लग्नाचा बाजारच मांडला; गरजू तरुणांवर दलालांचा डोळा, फसवणूक केली लाखोंची…

Mar 01, 2026 | 11:44 AM
कर्करोग उपचारांसाठी ‘एआय’ तंत्रज्ञानावर दिला जाणार भर! एनसीजी-इंडिया एआय ‘कॅच’ अनुदान, एआयची अमलबजावणी गरजेची

कर्करोग उपचारांसाठी ‘एआय’ तंत्रज्ञानावर दिला जाणार भर! एनसीजी-इंडिया एआय ‘कॅच’ अनुदान, एआयची अमलबजावणी गरजेची

Mar 01, 2026 | 11:39 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Sunil Tatkare On Rohit Pawar : भाजपकडे तिकीट मागायला कोण गेलं होतं? तटकरेंची रोहित पवारांवर टीका

Sunil Tatkare On Rohit Pawar : भाजपकडे तिकीट मागायला कोण गेलं होतं? तटकरेंची रोहित पवारांवर टीका

Feb 28, 2026 | 07:59 PM
Dhule News :  मध्यवर्ती बस स्थानक येथील नोंदणी कक्षाच्या बाहेर ज्येष्ठ नागरिकांच्या लांबच लांब रांगा

Dhule News : मध्यवर्ती बस स्थानक येथील नोंदणी कक्षाच्या बाहेर ज्येष्ठ नागरिकांच्या लांबच लांब रांगा

Feb 28, 2026 | 07:53 PM
Sangli : मानाच्या गदा शासनाला परत करत, आझाद मैदानावर आंदोलनाचा ज्येष्ठ मल्लांचा इशारा

Sangli : मानाच्या गदा शासनाला परत करत, आझाद मैदानावर आंदोलनाचा ज्येष्ठ मल्लांचा इशारा

Feb 28, 2026 | 07:48 PM
Kolhapur Marathi School News राज्यातील एकही मराठी शाळा शाळा बंद करु देणार नाही,तीव्र लढा उभारला जाईल

Kolhapur Marathi School News राज्यातील एकही मराठी शाळा शाळा बंद करु देणार नाही,तीव्र लढा उभारला जाईल

Feb 28, 2026 | 07:43 PM
Latur Crime News : विविध भागात दहशत माजवत, गाड्यांची तोडफोड घरांवर केली होती दगडफेक

Latur Crime News : विविध भागात दहशत माजवत, गाड्यांची तोडफोड घरांवर केली होती दगडफेक

Feb 28, 2026 | 07:36 PM
Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्यसेवेचा फज्जा उडाला -वैभव नाईक

Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्यसेवेचा फज्जा उडाला -वैभव नाईक

Feb 28, 2026 | 06:45 PM
Ratnagiri : राष्ट्रीय महामार्गावरील बेशिस्त चालकांवर आता रडारची नजर

Ratnagiri : राष्ट्रीय महामार्गावरील बेशिस्त चालकांवर आता रडारची नजर

Feb 28, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.