

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अखेर शेवटच्या टप्प्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून राज्यात सुरू असलेल्य रणसंग्राम येणाऱ्या अवघ्या तीन-चार दिवसांत संपणार आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान पार पडले. त्यानंतर राज्यात आता एक्झिट पोलचे अंदाज येऊ लागले आहेत. आतापर्यंत आलेल्या अनेक एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात महायुतीच्या बाजूने विजयी कल दिला आहे. पण राज्यात दोन पक्षांमध्ये झालेल्या पक्षफुटीनंतर राज्यात काय चित्र आहे, याबाबत जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे.
महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षात 2 प्रमुख पक्षामंध्ये उभी फूट पडली. त्यामुळे राज्यात अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तर गेल्या वर्षी अजित पवार यांनीदेखील शरद पवारांशी फारकत घेतली आणि आपल्या समर्थक आमदारांसह सत्ताधारी भाजपसोबत हातमिळवणी केली. त्यामुळे पक्षसोबतच पवार कुटुंबातही फूट पडली.
लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटावर मोठी नामुष्कीची वेळ आली. अजित पवार गटाला चार जागा मिळाल्या होत्या पण त्यातही फक्त एकाच जागेवर त्यांना यश मिळवता आले.त्याउलट शरद पवार यांच्या गटाला 10 जागा मिळाल्या, त्यातील 8 उमेदवारांचा विजय झाला. विधानसभा निवडणुकीतही लोकसभेची पुनरावृत्ती होईल असे अंदाज वर्तवण्यात येत होते. आता विधानसभेचे मतदान झाल्यानंतर आलेल्या एक्झिट पोलच्या आकड्यांवरून अनेक अंदाज वर्तवण्यात येत आहेत.
महाराष्ट्रात समोर आलेल्या एग्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटांबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवण्यात आले आहेत.
चाणक्य पोलनुसार : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 22 प्लस
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 40 प्लस
मॅट्रिझ एग्झिट पोलनुसार : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 17-26
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार 35-43
पोलडायरी पोलनुसार : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 18-28
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार 25-39
इलेक्टोरल एज पोलनुसार: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 14
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 46