U-14 National Tennis Championship
पुणे : दुहेरीत हृतिक कटकम व तविश पहवा यांना, तर आनंदिता उपाध्याय व रीत अरोरा यांना विजेतेपद मिळाले आहे. संभाजीनगर, ईएमएमटीसीतर्फे आयोजित व एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या ईएमएमटीसी-एमएसएलटीए 14 वर्षांखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या गटात एकेरीत महाराष्ट्राच्या सातव्या मानांकित पार्थसारथी मुंढेने ओडिशाच्या दुसऱ्या मानांकित आहानचा 4-6, 6-2, 6-0 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. तर दुहेरीत हृतिक कटकम व तविश पहवा यांना, तर आनंदिता उपाध्याय व रीत अरोरा यांना विजेतेपद मिळविले.
ईएमएमटीसी टेनिस कॉम्प्लेक्सवर सुरू स्पर्धा
ईएमएमटीसी टेनिस कॉम्प्लेक्सवर सुरु असलेल्या एकेरीत मुलांच्या गटात उपांत्य फेरीत अव्वल मानांकित तेलंगणाच्या हृतिक कटकमने आपली विजयी मालिका कायम ठेवत तिसऱ्या मानांकित शिवतेज शिरफुलेचा 6-3, 6-4 असा पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. दुसऱ्या मानांकित हरियाणाच्या तविश पहवाने कर्नाटकच्या चौथ्या मानांकित प्रकाश सरनचा टायब्रेकमध्ये 7-6(8),6-3 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.
अंतिम फेरीत धडक
मुलींच्या गटात तामिळनाडूच्या तिसऱ्या मानांकित सविता भुवनेश्वरनने काल मानांकित खेळाडूवर विजय मिळवणाऱ्या हरियाणाच्या पाचव्या मानांकित आनंदिता उपाध्यायचा 7-5, 6-3 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.
असा पराभव करून विजेतेपद पटकावले
दुहेरीत मुलांच्या गटात अंतिम फेरीत तेलंगणाच्या हृतिक कटकमने हरियाणाच्या तविश पहवाच्या साथीत तामिळनाडूच्या फजल अली मीर व कर्नाटकच्या प्रकाश सरन 6-4, 7-5 यांचा असा पराभव करून विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात हरियाणाच्या आनंदिता उपाध्याय व रीत अरोरा या जोडीने कर्नाटकच्या सृष्टी किरण व तामिळनाडूच्या सविता भुवनेश्वरन यांचा 6-3, 1-6, 10-7 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील दुहेरीतील विजेत्या व उपविजेत्या संघाला करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एनसीसी ट्रेनिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल संजीव शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ: एकेरी: उपांत्य फेरी: मुले:
हृतिक कटकम(तेलंगणा)(1)वि.वि.शिवतेज शिरफुले(महा)(3)6-3, 6-4;
तविश पहवा(हरियाणा)(2)वि.वि.प्रकाश सरन(कर्नाटक)(4) 7-6(8),6-3;
मुली:
सविता भुवनेश्वरन(तामिळनाडू)(3)वि.वि.आनंदिता उपाध्याय (हरयाणा)(5)7-5, 6-3;
पार्थसारथी मुंढे (महा(7)वि.वि.आहान(ओडिशा)(2) 4-6, मुंढे (महा)(1)6-0, 6-4;
आनंदिता उपाध्याय/रीत अरोरा(हरियाणा)(2)वि.वि.दीया अग्रवाल/वृंदिका राजपूत(महा)6-1, 6-4;
अंतिम फेरी: आनंदिता उपाध्याय/रीत अरोरा(हरियाणा)(2)वि.वि.सृष्टी किरण(कर्नाटक)/सविता भुवनेश्वरन(तामिळनाडू)6-3, 1-6, 10-7.






