
Marathi Breaking news live updates: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्हा चर्चेत आला आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचा हा दौऱा महत्त्वाचा मानला जात आहे.
गृहमंत्री अमित शाहांनी बिहारची विधानसभा निवडणूक जिंकण्याची तयारी सुरू केली आहे. भाजप आणि एनडीए घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना काही खास सूचना करताना, बिहारमध्ये भाजपकडून ‘मिशन 225+’चे ध्येय निश्चित करण्यात आलं आहे. अमित शाहांनी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र मॉडेलचा मास्टर प्लान अवलंबला असल्याची माहिती पुढे येते आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यापक 'परस्पर शुल्क' बुधवारी (२ एप्रिल) जाहीर झाल्यानंतर लगेचच लागू होतील. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी ही माहिती दिली. "माझ्या माहितीनुसार, हे शुल्क उद्या जाहीर केले जातील. ते तात्काळ लागू होतील आणि राष्ट्रपती बऱ्याच काळापासून त्याबाबत संकेत देत आहेत.
नवी दिल्ली: वक्फ सुधारणा विधेयक २०२४ आज (2 एप्रिल) लोकसभेत सादर करण्यात आले आहे. आजच या विधेयकावर चर्चा आणि मतदान करण्याची तयारी सुरू आहे. विरोधकांनी चर्चेसाठी १२ तासांचा वेळ मागितला. पण सरकारने फक्त ८ तासांचा वेळ दिला आहे. सरकार या विधेयकाला मुस्लिमांच्या हितासाठी सुधारणात्मक पाऊल म्हणत असताना, विरोधी पक्षांनी तीव्र विरोध केला आहे. दरम्यान या बिलावर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी पक्षाची भूमिका संसदेत मांडली. नेमके ते काय म्हणाले आहेत, जाणून घेऊयात.
वक्फ सुधारणा विधेयकवरुण बोलताना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत म्हणाले, "सरकारच्या बोलण्यात आणि करण्यात फरक दिसून येत आहे. जेपीसीमध्ये प्रत्येक गोष्टींवर चर्चा झालेली नाही. न्याय देण्यासाठी हे विधेयक आणलेले नाही. विधेयकात काही चुकीचे असेल तर त्याचे समर्थन करणार नाही. सर्वांचे लक्ष आमच्या पक्षावर लागले आहे. विधेयक आणण्यात तुमचं नक्की काय हेतू आहे हे स्पष्ट होत नाहीये.
वक्फमुळे मुस्लिम महिलांना प्रतिनिधित्व मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
ओडिशाचा मुख्य विरोधी पक्ष बिजू जनता दलाने बुधवारी वक्फ विधेयकाला विरोध करणार असल्याचे सांगितले. त्यांनी विधेयकात समाविष्ट करण्यासाठी काही सूचना दिल्या होत्या, ज्या नाकारण्यात आल्या. बीजेडीचे राज्यसभेचे खासदार आणि राष्ट्रीय प्रवक्ते सस्मित पात्रा म्हणाले की, राज्यसभेत पक्षाचे ७ सदस्य आहेत आणि ते या विधेयकाला विरोध करतील. तथापि, माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या नेतृत्वाखालील प्रादेशिक पक्षाचे लोकसभेत एकही सदस्य नाही.
सपा खासदार जया बच्चन म्हणाल्या की, हा मुद्दा खूप गंभीर आहे आणि सभागृह हे प्रकरण अतिशय हलक्यात घेत आहे. या विधेयकावर संसदीय स्थायी समितीमध्ये गांभीर्याने चर्चा झाली पाहिजे.
वक्फ सुधारित विधेयकाला काँग्रेसने लोकसभेत कडाडून विरोध केला. या विधेयकावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे विश्वासू खासदार गौरव गोगोई यांनी पक्षाची भूमिका मांडली. त्यांनी सुधारित विधेयकातील अनेक तरतुदींना कडाडून विरोध करताना आधीच्या कायद्यातील तरतुदींचा दाखला दिला. जे मुद्दे आधीच्या कायद्यामध्ये आहेत, तेच मुद्दे मुलामा लावून सुधारित विधेयकात असल्याचा आरोप त्यांनी केली. सरकार केवळ केवा विशिष्ट समाजाला लक्ष्य करण्यासाठी हे विधेयक आणत असल्याचेही ते म्हणाले. त्यांच्या भाषणाला विरोधी बाकांवरील सदस्यांना जोरदार दाद दिली.
घरात बसून सुंदर टेकड्याचं दृश्य पाहायला मिळेल असे स्वप्न उराशी बाळगून खारघर येथील "हिल व्ह्यू अपार्टमेंट" या इमारतीत घर खरेदी करणाऱ्या रहिवाशांनवर भर उन्हात बसून इमारतीचे तोडकाम पाहण्याची वेळ बुधवारी ( ता. 2) आली. इमारत उभारताना सिडकोची परवानगी न घेतल्याने खारघर येथील सेक्टर 5 येथील हेदोर वाडी या परिसरात बांधण्यात आलेल्या हिल व्ह्यू अपार्टमेंट या इमारतीवर सिडको विभागाकडून बुधवारी कारवाई करण्यात आली. कारवाईची कोणतीच कल्पना नसलेल्या इमारती मधील रहिवाशी गाढ झोपेत असताना पहाटे चार च्या सुमारास सिडकोचे अतिक्रमण विरोधी पथक इमारती बाहेर दाखल झाल्याने झोप उडालेल्या रहिवाशांची घर खाली करताना चांगलीच दमछाक झाली.
स्मार्टफोन कंपनी Motorola ने आज भारतात त्यांचा नवीन स्मार्टफोन Motorola Edge 60 Fusion लाँच केला आहे. हा स्मार्टफोन बजेट रेंजमध्ये लाँच करण्यात आला आहे. यामध्ये अनेक AI फीचर्स देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनची किंमत 30 हजारांहून कमी आहे. कंपनीने लाँच केलेला नवीन स्मार्टफोन मीडियाटेकच्या पावरफुल डाइमेंसिटी 7400 प्रोसेसरने सुसज्ज आहे. या फोनमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्टसह मोठी बॅटरी देखील देण्यात आली आहे, ज्यामुळे युजर्स दिर्घकाळ स्मार्टफोनचा वापर करू शकतील.
गौरव गोगोई म्हणाले की, संधिवन कमकुवत करणे, गोंधळ पसरवणे, भारतीय समाज अल्पसंख्याकांमध्ये विभागणे हे अल्पसंख्याकांना वेगळे करणे आहे. ते आम्हाला ईदच्या दिवशी नमाज अदा करू देत नाहीत, ते किती खासदार अल्पसंख्याक आहेत याबद्दल बोलतील. वक्फ दुरुस्ती विधेयक भारतीय संविधानाच्या विरुद्ध आहे. सरकार धर्माच्या आधारावर फूट पाडत आहे. तुम्ही कसला कायदा बनवत आहात, हा कसला न्याय आहे? त्यांना वक्फ बोर्ड कमकुवत हवे आहे. महसूल ७ ते ११ टक्क्यांनी वाढवायला हवा होता आणि त्यापेक्षा कमी नाही.
नवीन वक्फ विधेयकाचे नाव 'UMEED' असे बदलण्यात आले आहे. या सुधारित विधेयकामुळे एक नवी पहाट उगवणार आहे. कोट्यवधी मुस्लिमांना याचा फायदा होईल. मुस्लिमांनी या विधेयकाचे स्वागत केले आहे. मंडळाचे लेखापरीक्षण करण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. या विधेयकानंतर, वक्फ बोर्डाच्या मालकीच्या मालमत्तेची प्रत्यक्ष रक्कम कळेल.
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, जगात सर्वाधिक वक्फ मालमत्ता भारतात आहेत, तरीही मुस्लिम गरीब का आहेत? गरीब मुस्लिमांसाठी ती मालमत्ता का वापरली गेली नाही? काँग्रेसने मुस्लिमांना सत्तेसाठी व्होट बँक बनवले आहे. देशात ८.७२ लाख वक्फ मालमत्ता आहेत.
वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर करण्यात आलं आहे. अल्पसंख्याक मंत्री रिजिजू यांनी विधेयक सादर केलं आहे. विधेयकावर 97 लाख सूचना आल्या असल्याचंही अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं आहे. तसेच “कायद्याच्या जाणकारांकडूनही आम्ही सूचना मागवल्या आहेत. वक्फ विधेयक आलं तेव्हा कुणीही आक्षेप घेतला नाही, आणि आता आम्ही विधेयकामध्ये बदल करतोय तर आक्षेप घेतले जात आहेत.” असंही रिजिजू यांनी म्हटलं आहे.
सध्या 24 तास सुविधा देणाऱ्या दुकानांवर कायद्याने वेळेचे निर्बंध नाहीत. त्यामुळे, ती 24 तास सुरू राहू शकतात. शिवाय, या दुकानांमुळे ग्राहकांसह अर्थव्यवस्थेला फायदा होतो, असे निरीक्षण मंगळवारी उच्च न्यायालयाने नोंदवले. तसेच, रात्री 11 वाजेपर्यंत दुकाने बंद करण्याची सक्ती न करण्याचे आदेशही न्यायालयाने पुणे पोलिसांना दिले.
लोकसभेत बहुचर्चित वक्फ दुरुस्ती विधेयक सादर केले जाणार आहे. सत्ताधारी भाजपने आपली तयारी पूर्ण केली असून, आपल्या खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्यास सांगणारा तीन ओळींचा व्हीप जारी करण्यात आला आहे. भाजपचे काही मित्रपक्ष वक्फ विधेयकाला पाठिंबा देण्याबाबत साशंक आहेत. सरकारने मित्रपक्षांच्या सूचनांचाही समावेश केला आहे. तर विरोधकांनीही सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे. या दुरूस्ती विधेयकावरून देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊतांमध्ये ट्विटर वॉर सुरू झाले आहे.
आशियाई भूभागात तणाव आणखी वाढताना दिसत आहे. चीनने तैवानभोवती ‘स्ट्रेट थंडर-2025A’ (Strait Thunder-2025A) नावाने एक मोठा लष्करी सराव सुरू केला आहे. या सरावाचा उद्देश तैवानच्या नाकेबंदीची क्षमता सुधारण्यासोबत अचूक हल्ले करण्याचा सराव करणे आहे, असे चीनच्या लष्कराने जाहीर केले आहे. चीनच्या या आक्रमक पावलामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे.
महापालिकेच्या 35 जलतरण तलावांपैकी 25 जलतरण तलाव सुरु असून, उर्वरीत दहा जलतरण तलाव दुरुस्ती आणि तांत्रिक बाबींमुळे बंद आहेत. तसेच महापालिकेच्या क्रीडा विभागाने या जलतरण तलावांची पाहणी केली आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाढणारी गर्दी लक्षात घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन एका नातेवाईकाच्या लग्नासाठी पुण्यात पोहोचले होते. या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अलिकडेच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये ऐश्वर्या आणि अभिषेक ‘बंटी और बबली’ चित्रपटातील ‘कजरा रे’ गाण्यावर नाचताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये मुलगी आराध्या देखील दिसत आहे आणि या दोघांसोबत डान्स करताना दिसत आहे.
सूत्रधारांपैकी एक टायगर मेमन आणि त्याच्या कुटुंबाच्या १४ मालमत्ता केंद्र सरकारकडे सोपवण्याचे आदेश मुंबईतील एका विशेष न्यायालयाने दिले. दहशतवादी आणि विध्वंसक क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा-१९८७ (टाडा) न्यायालयाच्या आदेशानंतर १९९४ पासून या मालमत्ता मुंबई उच्च न्यायालयाच्या 'प्राप्तकर्त्या' च्या ताब्यात होत्या.
गंगा जल शुद्धच आहे, अशा आशयाचं होर्डिंग समाधान सरवणकरांकडून लावण्यात आले. याचपार्श्वभूमीवर मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे.
आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामातील 14 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. हा सामना बुधवार, 2 एप्रिल रोजी बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आज घरच्या मैदानावर आयपीएल 2025 मधील पहिला सामना खेळणार आहे. त्यामुळे बंगरुळू आज विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.
LSG vs PBKS : समोर ऐकून घेणारा केएल नाही..! एलएसजीच्या पराभवावर संजीव गोयंका पंतकडे रागावून नाही, तर हसून बघताय..#IPL2025 #LSGvsPBKS #SanjivGoenka #MarathiNews https://t.co/qFzF66k6YZ
— Navarashtra (@navarashtra) April 2, 2025
गेल्या काही दिवसांपासून विविध राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यात आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. कारण, आज लोकसभेत बहुचर्चित वक्फ दुरुस्ती विधेयक सादर केले जाणार आहे.
सविस्तर बातमीसाठी इथे क्लिक करा-
सविस्तर बातमीसाठी इथे क्लिक करा -
आयपीएल 2025 चा हा 18 वा हंगाम चांगलाच रंगात आला आहे. काल मंगळवारी (दि. 1 एप्रिल) लखनऊमधील एकेना स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यामध्ये पंजाबच्या संघाने एलएसजीचा पराभव केला आहे. या विजयाने पंजाबने या हंगामात सलग दुसऱ्या विजय मिळवला तर दुसरीकडे लखनऊचा मात्र दुसरा पराभव ठरला आहे. पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्सचा 8 विकेट्सने पराभूत केले. या सामन्यात एक प्रकार घडला. जो सध्या खूप व्हायरल झाला आहे. यामध्ये युजी चहलने निकोलस पूरनला शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे.