बांधकाम विभागात बोगस एफडीआर ? ( सौजन्य - सोशल मीडिया )
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत निघणाऱ्या निविदा प्रक्रियेत कंत्राटदारांना कामाच्या एकूण मूल्याच्या १ ते २ टक्के सुरक्षा अनामत रक्कम राष्ट्रीयीकृत बँकेच्या एफडीआरच्या स्वरूपात जमा करावी लागते. नियमानुसार ही रक्कम प्रत्यक्ष बँकेत भरल्याशिवाय एफडीआर जारी होत नाही. मात्र, जव्हार बांधकाम विभागात मजर्जीतील कंत्राटदारांनी लाखो-कोट्यवधी रुपयांच्या कामांसाठी बनावट एफडीआर जोडून शासकीय नियमांची उघड पायमल्ली केल्याचा आरोप शिवक्रांती संघटनेचे शरद पाटील यांनी केला आहे. या संशयावरून त्यांनी टेंडर क्रमांक व एफडीआर क्रमांकांची यादी देत सखोल माहिती मागवली होती.
या तक्रारीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित स्टेट बैंक ऑफ इंडियाच्या शाखेकडे या एफडीआरच्या अधिकृततेबाबत पडताळणी सुरू केली. मात्र, बँकेचा अहवाल येऊन बिंग फुटण्याआधीच कार्यालयात मोठा नाट्यमय घडामोडी घडल्या. विभागातील वरिष्ठ लिपिक गायकवाड यांच्या टेबलावरून मूळ कागदपत्रांची फाईल रहस्यमयरित्या गायब झाली. कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक अज्ञात व्यक्ती कागदपत्रे घेऊन जात असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी गायकवाड यांनी जव्हार पोलिसांत रीतसर तक्रार नोंदवली आहे.
66 टेबलावरून कागदपत्रे गहाळ झाल्याची बाब गंभीर असून याप्रकरणी आम्ही तात्काळ जव्हार पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल केली आहे. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
– संजय डोंगरे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बाधकाम विभाग, जव्हार
कार्यालयातील अंतर्गत संगनमताशिवाय शासकीय टेबलावरून इतकी संवेदनशील कागदपत्रे चोरीला जाणे अशक्य असल्याचे बोलले जात आहे. खोटी बिले आणि चनावट कागदपत्रांच्या जुन्या प्रकरणांनंतर आता बोगस एफडीआरचे नवे प्रकरण समोर आल्याने संपूर्ण जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, या प्रकरणाची सीआयडी किवा उच्चस्तरीय समितीमार्फत निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी शरद पाटील यांनी केली आहे.
Ans: निविदा प्रक्रियेत कंत्राटदारांना सादर करावी लागणारी सुरक्षा अनामत रक्कम भरण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांच्या बनावट/बोगस मुदत ठेव पावत्या जोडल्याचा आरोप आणि संशय समोर आला आहे.
Ans: बँकेकडून एफडीआरच्या अधिकृततेचा अहवाल येण्यापूर्वीच वरिष्ठ लिपिकाच्या टेबलावरून या घोटाळ्याशी संबंधित मूळ कागदपत्रांची फाईल गायब झाली, ज्याची नोंद सीसीटीव्हीत झाली आहे.
Ans: कार्यकारी अभियंता संजय डोंगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्यालयातून कागदपत्रे चोरीला गेल्याप्रकरणी जव्हार पोलिसांत रीतसर तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.






