पालघरमधील मोखाडा तालुक्यात शिवसेनाचा (शिंदे गट) कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. निवडणूकीसाठी सज्ज राहा असे आवाहन आमदार रविंद्र फाटक यांनी या मेळाव्यात केले.
आंबिस्ते आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या आत्महत्येने पालघर जिल्हा शोकाकुल झाला आहे. आमदार हरिश्चंद्र भोये आणि खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी घटनास्थळी भेट देत सखोल चौकशीची मागणी केली.
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील आंबिस्ते आश्रमशाळेत विद्यार्थ्यांची सुरक्षितता पुन्हा एकदा रामभरोसे असल्याचं स्पष्ट झालं आहे. या आश्रमशाळेत दोन विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे
प्रीती जाधव हिला प्रसूती दरम्यान स्थिती गंभीर झाल्याने मनोर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचाराऐवजी रुग्णाला “लवकर दुसरीकडे घेऊन जा” असे सांगून हात वर केले. रुग्णालयात 108 ॲम्बुलन्स तत्काळ उपलब्ध करून देण्यात…
पालघरमध्ये धक्कादायक प्रकार उघड! फक्त ५० हजारांसाठी आजीने १४ वर्षीय नातीची विक्री केली. जबरदस्तीने लग्न लावून सासरी छळ; तक्रारीनंतर पती व दलाल अटकेत, चार आरोपी फरार.
तोरणगण घाटात तीन वाहनांचा अपघात; ट्रक उलटला पण सुदैवाने जीवितहानी नाही. स्थानिकांचा प्रशासनावर आरोप, सुरक्षा उपायांचा अभाव असल्याने अपघातांची मालिका थांबत नाही.
मोखाडा तालुक्यातील खोडाळा ग्रामीण रुग्णालयासाठी मंजुरी मिळून वर्ष उलटले तरी कामाला सुरुवात न झाल्याने ग्रामस्थ नाराज आहेत. मंजुरी असूनही रुग्णालयाचे स्वप्न धूसरच राहिले आहे.
पालघर जिल्ह्यातील २९ जिल्हा परिषद शाळांमधील ६२ धोकादायक वर्गखोल्या पाडण्याचे आदेश जानेवारी २०२४ मध्ये देण्यात आले तरी आजवर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
मोखाडा तालुक्यातील त्र्यंबकेश्वर मार्गासह अनेक राज्य मार्गांची दयनीय अवस्था झाली असून मोठमोठे खड्डे आणि कोसळलेल्या संरक्षणभिंतीमुळे प्रवाशांचे जीव धोक्यात आले आहेत.
रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीचा मागील भाग मंगळवारी मध्यरात्री कोसळून दुर्घटना घडली यातील मृतांचा आकडा आता १५ वर पोहोचला असून शोधकार्य आणि बचावकार्य अजूनही सुरु आहे.
पालघर जिल्ह्यातील उर्से गावाने तब्बल 53 वर्षे अखंड परंपरा जपली आहे. या गावात प्रत्येक घरात वेगवेगळे गणपती बसवले जात नाहीत, तर संपूर्ण गाव एकत्र येऊन एकच गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करतो.
एकीकडे राज्याच्या राजकीय वातावरणात बदल होत असतानाच दुसरीकडे पालघरमधील मोखाडा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची कार्यकारिणी बैठक अचानकच बरखास्त झाली आहे.