पुणे : पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित सातव्या पीवायसी एचडीएफसी बँक रॅकेट लीग स्पर्धेत किड्स गटात स्लॅमर्स संघाने विजेतेपद संपादन केले. पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या टेबल टेनिस, टेनिस व बॅडमिंटन कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत स्लॅमर्स संघाने पंचर्स संघाचा 7-5 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
स्लॅमर्स संघाने पंचर्स संघाला 2-2 असे बरोबरीत रोखले
सामन्यात बॅडमिंटनमध्ये वरद चितळे, रिया करंदीकर, परम जालन, विहान सोमण, इरा पाटील, राघव के यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर स्लॅमर्स संघाने पंचर्स संघाचा 3-1 असा पराभव करून आघाडी घेतली. टेबल टेनिसमध्ये स्लॅमर्स व पंचर्स यांच्यातील लढत 2-2 बरोबरीत सुटली. टेनिसमध्येदेखील स्लॅमर्स संघाने पंचर्स संघाला 2-2 असे बरोबरीत रोखले. पण, स्लॅमर्स संघाने पंचर्सविरुद्ध हा सामना 7-5 असा जिंकून विजय मिळवला.
उपविजेत्या संघाला करंडक अशी पारितोषिके
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघाला करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, क्लबचे मानद सचिव सारंग लागू, एचडीएफसी बँकेच्या रिटेल विभागाचे विभागीय प्रमुख राहुल कुलकर्णी, रिलेशनशिप बँकिंग विभागाचे मुख्य मनोज पहूजा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लबच्या टेनिस विभागाचे सचिव अभिषेक ताम्हाणे, बॅडमिंटन व टेबलटेनिस विभागाचे सचिव तन्मय आगाशे, तुषार नगरकर, रणजित पांडे, दिप्ती सरदेसाई, केदार नाडगोंडे, नंदन डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल : अंतिम फेरी :
स्लॅमर्स वि.वि.पंचर्स 7-5
बॅडमिंटन: स्लॅमर्स वि.वि.पंचर्स 3-1(वरद चितळे/रिया करंदीकर वि.वि.रोहीन लागू/विहान पाटणकर 20-8; परम जालन/विहान सोमण वि.वि.तनया गाला/ऋषभ बेडेकर 20-8; अनुष्का चिरपुटकर/अन्वी पाटणकर पराभुत वि.रिषभ बेहेरे/विवान ओगले 19-20; इरा पाटील/राघव के वि.वि.रीत जालन/तनया साठे 20-13)
टेबल टेनिस : स्लॅमर्स बरोबरी वि.पंचर्स 2-2(परम जालन/आर्य बजाज वि.वि.अश्विन साठे/विहान पाटणकर 20-13; अनुष्का चिरपुटकर/अन्वी पाटणकर पराभुत वि.रिषभ बेहरे/देव मुठे 04-20; अयान जमेनीस/वरद चितळे वि.वि.रोहीन लागु/रिषभ बेडेकर 20-07; इरा पाटील/राघव के पराभुत वि.तनया साठे/रीत जालन 02-20);
टेनिस : स्लॅमर्स बरोबरी वि.पंचर्स 2-2(अयान जमेनीस वि.वि.देव मुठे 15-6; अन्वीता टेपन पराभुत वि. रिषभ बेहरे 12-15; अनुष्का चिरपुटकर पराभुत वि.सान्वी जोग 14-15; अन्वीता टेपन वि.वि.तनया साठे 15-5).
इतर पारितोषिके :
बॅडमिंटन प्लेयर ऑफ द टूर्नामेंट : वरद चितळे व रिया करंदीकर
टेनिस प्लेयर ऑफ द टूर्नामेंट : अयान जमेनीस व अन्विता टेपन
टेबलटेनिस प्लेयर ऑफ द टूर्नामेंट : रिषभ बेहरे व आरव श्रॉफ
प्लेयर ऑफ द टूर्नामेंट(मुले) : रिषभ बेहरे
प्लेयर ऑफ द टूर्नामेंट(मुली) : अनुष्का चिरपुटकर.






