आर्णीत शहरात खळबळजनक घटना, चक्क सेवा निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या घरातून रिव्हॉल्वर चोरी

आर्णी येथील धुमाजी नाईक मंगल कार्यालायाच्या मागे सेवा निवृत्त पोलीस कर्मचारी प्रभू गव्हाणकर राहतात. नजरचुकीने घरातील दुसरा दरवाजा उघड राहिल्याने त्यांच्या घरून अज्ञात चोरटयांनी रिव्हॉल्वर आणि सात राऊंडची चोरी केल्याची तक्रार त्यांनी केली असता अज्ञात चोरट्यांन  विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 
A revolver was stolen from the home of a retired police officer
Published on: 
Updated on: 
आर्णी : यवतमाळातील आर्णी येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सेवा निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या घरून रिव्हॉल्वर आणि सात राऊंडची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रभू गव्हाणकर, असे त्या सेवानिवृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. नेहमी प्रमाणे ते मॉर्निग वॉक करीत घराबाहेर पडले. त्यांच्या घरातील दिवाणाच्या खाली रिव्हॉल्व्हर ठेवलेली होती. परंतु, चुकीने गव्हाणकर यांच्या हाताने घरातील दुसरा दरवाजा उघडा राहिला आणि चोरटयांनी आपला डाव साधला. चोरटयांनी त्यांची रिव्हॉल्व्हर व सात राऊंड त्यांच्या घरातून चोरी केले.  
आर्णी येथील धुमाजी नाईक मंगल कार्यालायाच्या मागे सेवा निवृत्त पोलीस कर्मचारी प्रभू गव्हाणकर राहतात. नजरचुकीने घरातील दुसरा दरवाजा उघड राहिल्याने त्यांच्या घरून अज्ञात चोरटयांनी रिव्हॉल्वर आणि सात राऊंडची चोरी केल्याची तक्रार त्यांनी केली असता अज्ञात चोरट्यांन  विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  तसेच, या गंभीर प्रकाराबद्दल पोलीस तपास करीत आहे. तसेच, गव्हाणकर यांनी आत्मसंरक्षनासाठी हा परवाना घेतला होता. या घटनेने संपूर्ण आर्णी शहरात खळबळ उडाली आहे.