'आदिपुरूष' चित्रपटात फक्त तगडी स्टारकास्ट....ओम राऊतने मेगा बजेट सिनेमात घातला नुसता गोंधळ...चित्रपट समीक्षकांसह प्रेक्षकांची निराशा

मेगा बजेट आणि तगडी स्टारकास्ट असलेला बहुचर्चित ‘आदिपुरुष’ चित्रपट प्रदर्शित झाला. व्हीएफएक्स आणि इतर वादांमुळे दोनदा टीझर व ट्रेलरमध्ये बदल करण्यात आले. शिवाय चित्रपटाचं प्रदर्शनही पुढे ढकलण्यात आलं होतं. त्यानंतर अखेरीस चित्रपट प्रदर्शित झाला, मात्र तरीही प्रेक्षकांची निराशा झाल्याचं दिसतंय. काय कारणं आहेत...वाचा सविस्तर
om
Published on: 
Updated on: 

गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये ज्या चित्रपटाची उत्सुकता होती तो चित्रपट म्हणजे आदिपुरूष....आज अखेर तो रिलीज झाला....बॉलिवूडचा आतापर्यंचा सर्वात महागडा चित्रपट अशी त्याची ओळख तब्बल 500 कोटींचं बजेट असलेला हा चित्रपट त्यात रामायणाची कथा आणि जबरदस्त स्टारकास्ट आणि VFX इफेक्ट त्यामुळे हा चित्रपट धमाका करणार हे नक्की....पण, प्री बुकींगमुळे आणि माऊथ पब्लिसिटीमुळे या चित्रपटाने चांगला गल्ला कमावला असला तरी, हा चित्रपट प्रेक्षकांना फारसा आवडला नसल्याचं चित्रपट समीक्षकांचं म्हणणं आहे.  चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी हा चित्रपट निराशाजनक असल्याचं म्हटलं आहे.

(adipurush)(filmreview)

“आदिपुरुष हा एक निराशाजनक चित्रपट आहे. तो आपल्या कोणत्याही अपेक्षा पूर्ण करत नाही. दिग्दर्शक ओम राऊतकडे एक स्वप्नवत स्टारकास्ट आणि प्रचंड मोठं बजेट होतं. पण त्याचा वापर त्याने फक्त गोंधळ निर्माण करण्यासाठी केला आहे,” असं ट्वीट तरण आदर्श यांनी केलंय. त्यांनी चित्रपटाला फक्त अर्धा स्टार रेटिंग दिलंय. (taran adarash)

तरण आदर्श यांच्या ट्वीटवर अनेक युजर कमेंट्स करत आहेत. ‘बरं झालं तिकिट काढलं नाही, पैसे वाचले,’ ‘आदिपुरुष पाहिल्यानंतर गरुड पुराणात एक शिक्षा आणखी वाढली असेल,’ अशा कमेंट्स नेटकरी त्यावर करत आहेत. दरम्यान, या चित्रपटात प्रभास,क्रिती सॅनॉन,सैफ अली खान आणि देवदत्त नागे यांच्या प्रमुख भुमिका आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन ओम राऊतने केलं आहे. (prabhas,kritisanon,saifalikhan,omraut)

चित्रपट प्रदर्शनापूर्वी अनेकवेळा विविध कारणांनी चर्चेत आला. पब्लिसिटीसाठी या चित्रपटाला खूप फायदा झाला. मात्र, येत्या काळात हा चित्रपट किती बिझनेस करतो हे पाहणं इंटरेस्टींग असेल.