tejaswini and amruta
बिग बॉस मराठीच्या(Bigg Boss Marathi 4) घरात येऊन आता सदस्यांना अकरा दिवस झाले आहेत. अनेक सदस्यांमध्ये छान मैत्री निर्माण झाली आहे. तर काही सदस्यांमध्ये भांडणं सुरु आहेत. आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अमृता धोंगडे (Amruta Dhongde) आणि तेजस्विनी (Tejaswini) या मैत्रिणींमध्ये वादाची पहिली ठिणगी पडणार आहे. जेवण बनवण्यावरून दोघींमध्ये वाद झाला.
[read_also content=”भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरचा आज ४१ वा वाढदिवस https://www.navarashtra.com/sports/former-indian-cricketer-gautam-gambhirs-41st-birthday-today-336120/”]
नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये दिसून येत आहे की, अमृता तेजस्विनीवर जेवणाच्या मुद्द्यावरून भडकली आहे. याच वरून दोघींमध्ये वादाला सुरुवात झाली. “तेजस्विनी तू आता काय करते आहेस ?” त्यावर तेजस्विनी म्हणाली, “ मी बनवणार नाही ही पद्धत नव्हे.” त्यावर अमृताचा पारा चढला “हो हीच पद्धत आहे आता”, असे अमृताने तेजस्विनीला ठणकावून सांगितले. तेजस्विनीचे म्हणणे आहे, “अरेरावीची भाषा नको करुस, हाय वे माय वे मला नाही चालतं.” अमृता स्वतःशी बोलताना म्हणाली, “सगळ्यांचीच मनधरणी करायला आली आहे मी.” घरामध्ये झाल्या प्रकारामुळे अमृताला अश्रू अनावर झाले. बघूया आजच्या भागामध्ये या दोघींमधील भांडणं मिटेल की अजूनच वाढेल?