

बॉलिवूडचा स्टार आमिर खानचा मुलगा जुनैद खानने त्याच्या 'महाराज' या चित्रपटातून अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली आहे. OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षक दोघांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्याचवेळी जुनेद खानने आता बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्याच्या वडिलांची म्हणजेच अमीर खानची 'महाराज'बद्दल काय प्रतिक्रिया होती हे सांगितले आहे.
जुनैद खानने आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्रात प्रवेश केला आणि 'महाराज' चित्रपटातून पदार्पण केले आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी बराच वादही झाला होता, पण शेवटी निर्णय चित्रपटाच्या बाजूने लागलेला दिसला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसादसुद्धा दिला आहे.
आमिर खानला चित्रपट आवडला का?
'महाराज'मध्ये जुनेद खानने समाजसुधारक करसनदास मुळजी यांची भूमिका साकारली आहे, जो 1800 च्या दशकात समाजात पसरलेल्या वाईट गोष्टींविरोधात आवाज उठवतो. आपल्या डेब्यू चित्रपटाबद्दल वडील आमिर खानच्या प्रतिक्रियेबद्दल बोलताना जुनेद खानने बॉलीवूड लाईफशी संवाद साधताना सांगितले की, "त्यांना चित्रपट खूप आवडला. पहा, मला परफेक्शनिस्ट्सबद्दल माहिती नाही, परंतु जेव्हा बाबा चित्रपट पाहतात तेव्हा त्यांना नेहमीच आनंद घ्यायचा असतो.ते चित्रपट पाहताना तो एन्जॉय करत असतात. त्यामुळेच त्यांना चित्रपट निर्माता असलेली पत्नी पसंतीस आली. याचदरम्यान तो आई बद्दल म्हणाला की, आईला समजणे कठीण आहे तिने सुद्धा हा चित्रपट पहिला आणि तिला भरपूर आनंद झाला होता. " असे जुनेद खानने सांगितले आहे.
महाराज चित्रपटाची कथा
जुनैद खानचा महाराज हा पहिला चित्रपट मानहानीच्या खटल्यावर आधारित आहे आणि काही आध्यात्मिक गटांमधील लैंगिक शोषणाच्या गंभीर पैलूंबद्दल भाष्य करणारा हा चित्रपट आहे. जुनैद व्यतिरिक्त 'महाराज' मध्ये जयदीप अहलावत, शर्वरी, शालिनी पांडे आणि इतर कलाकार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ पी मल्होत्रा यांनी केले आहे. तर YRF एंटरटेनमेंटने त्याची निर्मिती केली आहे. 'महाराज' नेटफ्लिक्सवर स्ट्रीम झाला होता. YRF Entertainment आणि Netflix यांच्यातील हे पहिले सहकार्य आहे.