
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
टीव्ही क्वीन एकता कपूरने नागिनसाठी सुंदर अभिनेत्री निवडल्याचे म्हटलं जात आहे. रिपोर्ट्सनुसार, यावेळी प्रियांका चाहर चौधरी मुख्य भूमिकेत दिसू शकते. प्रियांकाने ‘उडारियां’ मध्ये दमदार अभिनय केला आणि त्यानंतर ती सलमान खानच्या शो ‘बिग बॉस १६’ मध्ये दिसली.
पाकिस्तानी अभिनेत्याच्या ‘अबीर गुलाल’ चित्रपटाला भारतात हिरवा कंदील; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित!
एकता कपूरच्या टीमकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही, काही दिवसांपूर्वी या शोचा टीझर आला होता. आतासोशल मीडियावर प्रियांका चहर चौधरीचं नाव मोठ्या प्रमाणावर चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. मौना रॉय, सुरभी ज्योत, तेजस्वी प्रकाश यांसारख्या अभिनेत्रींच्या अभिनयामुळे नागिन मालिका घराघरात पोहोचली होती. आता प्रियांका चौधरीचं नाव समोर आलं आहे.
‘स्टार प्रवाह’ वरील ‘या’ मालिका येत्या सोमवारपासून होणार बंद? नक्की कारण काय?
‘नागिन’ हा शो २०१५ मध्ये सुरू झाला
एकता कपूरच्या प्रॉडक्शन हाऊस बालाजी टेलिफिल्म्सच्या बॅनरखाली बनलेला ‘नागिन’ हा शो २०१५ मध्ये सुरू झाला. त्यात मुख्य भूमिका साकारणारी मौनी रॉय पहिली होती. ही मालिका तिच्या अनोख्या अलौकिक कथा, नागिनच्या रूपातील बदलांचे ट्विस्ट आणि हाय-ड्रामा सीक्वेन्ससाठी ओळखली जाते.