gadar 2
सनी देओलचा (Sunny Deol) ‘गदर’ हा सिनेमा खूप गाजला होता .‘गदर’ (Gadar) या २००१ प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. आता जवळपास २१ वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता या चित्रपटाचा दुसरा भाग ‘गदर २’ (Gadar 2)ची प्रेक्षक प्रतीक्षा करत आहेत. नुकतीच या चित्रपटातील सनी देओलची (Gadar 2 Sunny Deol First Look) पहिली झलक समोर आली आहे. या व्हिडिओमध्ये त्याने केलेला पराक्रम पाहून त्याचे आश्चर्यचकीत झाले आहेत.
नुकतीच ‘गदर २’ची एक छोटीशी क्लिप समोर आली आहे. यात ‘गदर’ चित्रपटात सनी देओल हातपंप काढताना दिसला होता. आता आगामी चित्रपटात तो आणखी एक मोठा पराक्रम करताना दिसत आहे. ‘झी स्टुडिओ’च्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये अनेक चित्रपटांची झलक दाखवण्यात आली आहे. यावर्षी रिलीज होणाऱ्या झी स्टुडिओजच्या सगळ्या चित्रपटांची झलक या एका व्हिडिओत दाखवण्यात आली आहे. त्यामध्ये एक सनी देओलची ‘गदर २’ चित्रपटातील क्लिपही दिसत आहे. या क्लिपमध्ये सनी देओलने बैलगाडीचे चाक उचलून डोक्यावर धरलेले दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड राग आहे. त्याने पगडी घातली आहे आणि तपकिरी रंगाचा ड्रेस घातला आहे.
[read_also content=”महावितरण कर्मचारी संप! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तातडीची बैठक, तोडगा निघणार का? कुठे व कसा बसला संपाचा फटका? वाचा सविस्तर… https://www.navarashtra.com/maharashtra/mahadistrivan-staff-strike-dcm-devendra-fadnavis-called-an-urgent-meeting-will-there-be-a-solution-where-and-how-hit-the-strike-read-more-359151/”]
सनी देओलने २००१ साली रिलीज झालेल्या ‘गदर: एक प्रेम कथा’ चित्रपटात तारा सिंग ही भूमिका साकारली होती. त्यावेळी हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. आता या चित्रपटाचा दुसरा भाग येणार आहे. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागातही तो तारा सिंगच्याच भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे या दुसऱ्या भागाबद्दलही प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. हा व्हिडिओ शेअर करण्यात आल्यानंतर #Gadar सोशल मीडियावर ट्रेंड करताना दिसत आहे.
‘गदर २’ मध्ये तारा सिंह त्याची पत्नी सकीना आणि त्यांचा मुलगा यांची पुढची गोष्ट पाहायला मिळणार आहे. आपले प्रेम परत आणण्यासाठी तारा सिंहने मुलाला घेऊन पाकिस्तानची सीमा ओलांडली आणि सर्वांशी लढा दिला. देशाचे नाव राखत त्याने आपल्या पत्नीला परत आणले होते. ‘गदर २’ मध्ये आता यापुढची कहाणी प्रेक्षकांना पाहायला मिळेल.