ganpati at madhuri dixit home
अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या (Madhuri Dixit) घरी बाप्पा विराजमान (ganeshotsav 2022) झाले आहे. माधुरीने बाप्पासोबतचा (Ganpati At Madhuri Dixit’s Home) एक फोटो नुकताच शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्यासोबत तिचा पती श्रीराम नेनेही दिसत आहे. माधुरीच्या घरी बाप्पासाठी खास पांढऱ्या फुलांची आरास केलेली दिसत आहे. याआधी माधुरीने एक व्हिडिओ शेअर करत गणेशोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या होत्या.
धकधक गर्लने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत गणरायाचे वेगवेगळे फोटो दिसतात आणि गणपतीची आरती ऐकू येते. त्यानंतर माधुरी म्हणते, “आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ! गणपती बाप्पा मोरया!”
माधुरी दिक्षित दरवर्षी उत्साहाने गणेशोत्सव साजरा करत असते. गणेशोत्सवाचे फोटोही ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.