Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अपारशक्ती खुरानाच्या ‘जुबली’ च्या ग्लोबल प्रीमियरची घोषणा, ‘या’ दिवशी प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार वेबसीरिज

‘जुबली’चा ग्लोबल प्रीमियर 7 एप्रिल 2023 रोजी होणार आहे. या वेबसीरिची निर्मिती सौमिक सेन आणि मोटवानी यांनी केली आहे.

  • By साधना
Updated On: Mar 17, 2023 | 06:37 PM
jubilee

jubilee

Follow Us
Close
Follow Us:

अमेझॉन प्राइम व्हिडिओने (Amazon Prime Video) आज आपली आगामी ओरिजनल सिरीज ‘जुबली’च्या (Jubilee) जागतिक प्रीमियरची घोषणा केली आहे.  एकूण 10 भागांचा फिक्शनल ड्रामा असलेल्या या सीरिजचं दिग्दर्शन विक्रमादित्य मोटवानी यांनी केलं आहे. या वेब सीरिजमध्ये प्रसेनजीत चॅटर्जी, अदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari), अपारशक्ती खुराना (Aparshakti Khurana), वामिका गब्बी, सिद्धांत गुप्ता, नंदिश संधू आणि राम कपूर यांच्या नेतृत्वाखाली  कलाकारांचा समावेश आहे. ‘जुबली’चा ग्लोबल प्रीमियर 7 एप्रिल 2023 रोजी होणार आहे. या वेबसीरिची निर्मिती सौमिक सेन आणि मोटवानी यांनी केली आहे. तसेच, एंडोलन फिल्म्सच्या सहयोगाने रिलायन्स एंटरटेनमेंट आणि फँटम स्टुडिओजद्वारा निर्मित या सिरीजची पटकथा आणि संवाद अतुल सभरवाल यांनी लिहिले आहेत.

भारत आणि चित्रपट या दोन्हींच्या विकासाशी समांतर, ‘जुबली’ अशा कथा आणि स्वप्नांचा खुलासा करते ज्यांनी हिंदी चित्रपट उद्योगाला जन्म दिला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगाच्या पार्श्‍वभूमीवर आधारित, ‘जुबली’ रोमांचक आणि काव्यात्मक कथा आहे जी पात्रांच्या एका समुहाभोवती विणलेली आहे आणि त्यांची स्वप्ने, आवड, महत्त्वाकांक्षा आणि प्रेम साध्य करण्यासाठी काहीही करण्यास तयार असतात. अशातच भारत आणि 240 देश आणि प्रदेशांमधील प्राइम सदस्यांसाठी 7 एप्रिल रोजी भाग एक (एक ते पाच भाग) स्ट्रीम करू शकतात, तर भाग 2 (भाग सहा ते दहा) पुढील आठवड्यात 14 एप्रिल रोजी प्रदर्शित केले जातील.

निर्माता आणि दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानी म्हणाले, ‘जुबली’ ही एक प्रेमकथा नेहमीच माझ्या मनात राहिली आहे. जेव्हा मी चित्रपटांमध्ये असिस्टंट डायरेक्टर होतो तेव्हा सांगण्यासाठी कोणतीही कथा नव्हती पण ही कथा बनवण्याचा माझा निर्धार होता. सीरिजचा उगम सिनेमाच्या प्रसिद्ध युगातला आहे. ‘जुबली’ही एक अतिशय उत्कृष्ट कथा आहे जी प्रत्येक माणसाबद्दल काहीतरी बोलते. यामुळेच मी कथेकडे प्रथम आकर्षित झालो. आम्ही आपले युग अनुरूप बनवून ठेवण्यासाठी सीरिजमधील प्रत्येक पैलूवर कठोर परिश्रम घेतले आहेत तसेच, संशोधन केले आहे. एका अप्रतिम स्टुडिओच्या समर्थनाने झालेला हा प्रवास उत्कृष्ट आहे, ज्यामध्ये अद्भुत अभिनेता आणि आतापर्यंतची सर्वोत्तम टीमचा समावेश आहे. आम्हाला ही सीरिज बनवताना खूप मजा आली आणि आता जग आमचे काम पाहणार असून, यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत.”

Web Title: Jubilee web seires premier from 7 april on amazon prime video nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2023 | 06:34 PM

Topics:  

  • amazon prime video
  • entertainment

संबंधित बातम्या

‘सगळेच Bisexual असतात..’ काय बोलून गेली स्वरा भास्कर, ‘या’ नेत्याच्या पत्नीवर आहे क्रश
1

‘सगळेच Bisexual असतात..’ काय बोलून गेली स्वरा भास्कर, ‘या’ नेत्याच्या पत्नीवर आहे क्रश

कोण आहे सहर बंबा? जी आर्यन खानच्या ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ मध्ये करणार रोमान्स, पाहा फोटो
2

कोण आहे सहर बंबा? जी आर्यन खानच्या ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ मध्ये करणार रोमान्स, पाहा फोटो

‘इतकं सोप्पं आहे का…?’, ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर जुई गडकरीची वाईट अवस्था, म्हणाली…
3

‘इतकं सोप्पं आहे का…?’, ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर जुई गडकरीची वाईट अवस्था, म्हणाली…

‘महाराष्ट्रात राहून मराठीचा अपमान…’ विवेक अग्निहोत्रींवर ‘या’ मराठमोळा अभिनेत्याचा संताप, म्हणाला, ‘इथे पैसे कमावता अन्…’
4

‘महाराष्ट्रात राहून मराठीचा अपमान…’ विवेक अग्निहोत्रींवर ‘या’ मराठमोळा अभिनेत्याचा संताप, म्हणाला, ‘इथे पैसे कमावता अन्…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.