vijay devarkonda and ranveer singh
अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) गेल्या काही दिवसांपासून ‘लाइगर’ (Liger Movie) चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या पोस्टरवरील विजयच्या न्यूड लूकचीही नेटकऱ्यांनी खूप चर्चा केली होती. नुकताच हैद्राबादमध्ये ‘लाइगर’चा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. त्यानंतर चित्रपटाची टीम मुंबईमध्ये दाखल झाली.
मुंबईमध्ये देखील ‘लाइगर’च्या प्रमोशनल कार्यक्रमाला विजय, अनन्या पांडेसह चित्रपटाची टीम उपस्थित होती. यावेळी अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) उपस्थित होता. अतिशय डॅशिंग अंदाजात रणवीरने कार्यक्रमात एन्ट्री केली. मात्र विजय देवरकोंडाचा लूक पाहून रणवीरने त्याची खिल्ली उडवली हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
[read_also content=”कोरोनाकडे दुर्लक्ष करु नका, वाढत्या रुग्णसंख्येची जागतिक आरोग्य संघटनेला चिंता https://www.navarashtra.com/world/world-health-organization-worried-about-the-corona-spread-nrsr-306801/”]
विजयने या कार्यक्रमासाठी काळ्या रंगाचा टी-शर्ट, कार्गो पँट आणि साधी चप्पल घातली होती. ते पाहून रणवीर म्हणाला, “भाईची स्टाईल तर बघा. असं वाटतंय मी नाही तर हाच (विजय देवरकोंडा) माझ्या ट्रेलर लाँच सोहळ्याला आला आहे.” इतकंच नव्हे तर रणवीरने त्याची तुलना जॉन अब्राहमशी देखील केली. विजयचा टी-शर्टपाहून जॉन अब्राहमनंतर तूच असं रणवीर त्याला म्हणाला.
पण रणवीरचं हे वागणं नेटकऱ्यांना आवडलं नाही. तुझ्यापेक्षा विजयच चांगला दिसत असल्याचं अनेकांनी कमेंटच्या माध्यमातून सांगितलं. दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांनी ‘लाइगर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. करण जोहर या चित्रपटाचा निर्माता आहे. हा चित्रपट २५ ऑगस्टला रिलीज होणार आहे.