nawazuddin and neha at jogira sara ra ra screening
नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) आणि अभिनेत्री नेहा शर्मा (Neha Sharma) यांचा ‘जोगिरा सारा रा रा’ (jogira Sara Ra Ra) हा चित्रपट आज (26 मे) रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. चित्रपट रिलीजच्या एक दिवस आधी या चित्रपटाचं स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्यात आलं होतं. दरम्यान या स्क्रिनिंगच्या कार्यक्रमातला नेहा आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ बघून दोघांमध्ये काहीतरी सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. (Nawazuddin Siddiqui And Neha Sharma Relationship)
नवाजुद्दीन सिद्दीकी आणि नेहा शर्मा त्यांच्या ‘जोगिरा सारा रा रा’ चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी आले होते. या स्क्रिनिंगच्या वेळी दोघांनी एकाच रंगाचे कपडे घातले होते. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोन कलाकारांना एकाच रंगाच्या कपड्यात बघून लोक त्यांच्या नात्याबद्दल चर्चा करू लागले आहेत. एकाने लिहिलं की, ‘त्यांच्यात काही चालले आहे का?’ दुसऱ्याने लिहिले, ‘मॅचिंग-मॅचिंग… काहीतरी- समथिंग.’ अन्य एका नेटकऱ्याने ‘कपल लग्नाच्या तयारीत आहे,’ अशी कमेंट केली आहे. काही यूजर्स या व्हिडिओवर तीव्र प्रतिक्रिया देत आहेत.
[read_also content=”‘जेव्हा मला हरल्यासारखं वाटतं तेव्हा मी स्वत:ला…’ वडिलांच्या आठवणीत रितेश देशमुख झाला भावूक https://www.navarashtra.com/entertainment/riteish-deshmukh-emotional-post-on-father-vilasrao-deshmukh-birthday-nrsr-404737/”]
नेहा शर्मासोबतच्या लिंकअपच्या प्रतिक्रियांवर नवाजुद्दीन सिद्दीकीने काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. नवाज आणि त्याची पत्नी आलियामध्ये सध्या वाद सुरू आहेत. हे वाद आता कोर्टापर्यंत गेले आहेत. काही दिवसांपूर्वी आलियाने सोशल मीडियावर नवाजुद्दीनसाठी एक पत्र लिहिलं होतं. या पत्रात नवाजवरील सर्व खटले मागे घेण्याचा आणि आपल्या मुलांना चांगले भविष्य देण्याचा उल्लेख केला होता. मात्र नंतर आलियाने ही पोस्ट डिलीट केली.
नवाजुद्दीनची पत्नी आणि आईत संपत्तीवरुन वाद सुरु होते. यावरुन त्यांच्यात भांडणही झाल्याचं सांगण्यात येतंय. काही दिवसांपूर्वी नवाजुद्दीनची आई मेहरुनिसा यांनी आलियाच्या विरोधात घरात जबरदस्तीने शिरल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. पोलिसांनीही या प्रकरणात गुन्हा दाखल केला. नवाजुद्दीनच्या पत्नीचं खरं नाव अंजना किशोर पांडे आहे, तिनं लग्नानंतर ते नाव अलिया जैनब असं केलेलं आहे.