swara bhaskar
बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. लेकीबरोबरचे खास क्षण ती सध्या चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतेय. नुकतीच स्वराने केलेल्या एका (Swara Bhaskar Social Media Post) पोस्टची खूप चर्चा सुरु आहे. अभिनेत्री स्वरा भास्करने लेकीसह एक फोटो शेअर करत भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. ज्यामध्ये स्वराने लिहीलंय, “कोणत्याही नव्या आईला माहिती असेल की, ती तिच्या चिमुकल्या बाळाकडे शांत आणि आनंदाच्या भावनेने अनेक तास एकटक पाहू शकते. यात मी काही अशा मातांपेक्षा वेगळी नाही आणि मला खात्री आहे की जगातल्या अनेक मातांप्रमाणे, जेव्हा आपण आपल्या बाळाकडे पाहतो तेव्हा आपल्याला जाणवणारी भावना आता सतत भीतीदायक विचारांनी व्यापलेली आहे. ज्याकडे दुर्लक्ष करणं कठीण झालं आहे.”
स्वरा पुढे लिहिते की,“मी माझ्या मुलीच्या शांत झोपलेल्या चेहऱ्याकडे पाहत राहते आणि विचार करते की, जर तिचा जन्म गाझामध्ये झाला असता तर मी तिचं संरक्षण कसं केलं असतं? अशा परिस्थितीत ती कधीच अडकू नये ही प्रार्थना करते आणि मग ती कोणत्या आशीर्वादाने जन्माला आली याचा विचार करत होते. याबरोबरच गाझाची मुलं कोणता शाप घेऊन जन्माला आली असतील, असा विचार मनात येतो. कारण त्यांच्या आयुष्यात संकटाचं आभाळ आलं आहे. त्यामुळे अशा ईश्वराकडे प्रार्थना करेल जो ऐकले, गाझाच्या मुलांना दु:ख, वेदना आणि मृत्यूपासून वाचवा. कारण जग त्यांचे रक्षण करणार नाही,” अशी भावनिक पोस्ट स्वरा भास्करने लिहिली आहे.
सिनेसृष्टीतील कुणीही इस्त्राइल आणि पॅलेस्टाइनमधल्या संघर्षावर बोलायला तयार नाही. मात्र स्वराने या विषयावर आपलं मत मांडलं आहे. काहींनी तिचं कौतुक केलंय तर काहिंनी इस्त्राइलमधल्या मुलांचं काय? असा प्रश्न तिला विचारला आहे.
दरम्यान, स्वराने 23 सप्टेंबरला एका गोंडस मुलीला जन्म दिला. स्वरा आणि पती फहाद अहमद यांनी आपल्या मुलीचं नाव राबिया ठेवलं आहे.