the kashmir files
‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफीसवर अजूनही हा सिनेमा धुमाकूळ घालत आहे. विवेक अग्नीहोत्रींनी (Vivek Agnihotri) दिग्दर्शित केलेल्या ‘द काश्मीर फाईल्स’मध्ये अनुपम खेर (Anupam Kher), मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakroborty), दर्शन कुमार (Darshan Kumar),पल्लवी जोशी (Pallavi Joshi), चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.
रिलीज झाल्यानंतर बाराव्या दिवशीही या चित्रपटाचा बॉक्स ऑफीसवर दबदबा कायम आहे. या चित्रपटाची कमाई २०० कोटींच्या घरात पोहोचण्याच्या मार्गावर आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाची कमाई बाराव्या दिवशी १९०.१० कोटी इतकी झाली आहे.
या चित्रपटामध्ये १९९० मध्ये काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराची कहाणी सांगण्यात आली आहे. उद्या हा चित्रपट २०० कोटींचा टप्पा पार करेल.चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यातील शुक्रवारी १९.१५ कोटी, शनिवारी २४.८० कोटी, रविवारी २६.२० कोटी, सोमवारी १२.४० कोटी, मंगळवारी १०.२५ कोटींचं कलेक्शन केलं. या सगळ्यानंतर चित्रपटाची कमाई आत्तापर्यंत १९०.१० कोटी झाली आहे. हा चित्रपट ११ मार्चला चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला होता. अनेक राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री आहे.