vishakha subhedar with daya
अभिनेत्री विशाखा सुभेदारनं ( Vishakha Subhedar ) महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasya Jatra ) हा शो सोडल्याची माहिती सोशल मीडियावर दिली होती. लवकरच विशाखा सुभेदार एका मराठी सिनेमात दिसणार आहे. विशेष म्हणजे हिंदी टीव्ही जगतातील सीआयडी फेम दया ( Dayanand Shetty )म्हणजे अभिनेता दयानंद शेट्टीसोबत ती काम करताना दिसणार आहे.
विशाखा सुभेदारनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या या आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती दिली आहे. शिवाय दयासोबतचे काही फोटो देखील शेअर केले आहे. ती या प्रोजेक्टसाठी उत्साही असल्याचे फोटोवरून दिसत आहे. तिनं फोटो शेअर करत म्हटलं आहे की,तोड दो ये दरवाजा, दया…#shoot #onset #setlife…तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंटमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत.
[read_also content=”हजारो कोटींची कमाई करणाऱ्या साऊथ चित्रपट स्टार्सची कमाई माहिती आहे का? बॉलिवूडलाही टाकतात मागे https://www.navarashtra.com/entertainment/these-south-starts-earned-more-than-bollywood-starts-nrak-272886/”]
विशाखानं काही दिवसापूर्वी महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो सोडला आहे. आगामी काही प्रोजेक्टसाठी तिनं हा शो सोडल्याची माहिती समोर आली होती. सोशल मीडिया पोस्ट करत तिने याबद्दल माहिती दिली आहे.