थंडीच्या दिवसांमध्ये सकाळी उठल्यानंतर शरीरात थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. यामुळे अनेकदा काम करण्याची सुद्धा इच्छा होत नाही. सकाळी झोपेतून उठल्यानंतर अनेकांना सगळ्यात आधी कॉफी किंवा दुधाचा चहा पिण्याची सवय असते. पण चहा पिण्याऐवजी तुम्ही दालचिनीच्या पाण्याचे सेवन करू शकता. दालचिनीचा वापर मसाल्यातील पदार्थांमध्ये केला जातो. या पाण्याचे सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी सेवन केल्यास शरीरात साचून राहिलेली घाण स्वच्छ होते. चला तर जाणून घेऊया दालचिनीचे पाणी प्यायल्यामुळे शरीराला होणारे फायदे.(फोटो सौजन्य – iStock)
हिवाळ्यात सकाळची सुरुवात करा दालचिनीच्या पाण्याने

दालचिनीमध्ये अँटीऑक्सिडंट, अँटीवायरल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळून येतात, जे शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहेत. कोमट पाण्यात अर्धा चमचा दालचिनी पावडर मिक्स करून पाण्याचे सेवन करा.

वाढलेले वजन कमी करण्यासाठी इतर प्रोटीन शेक पिण्याऐवजी तुम्ही दालचिनीच्या पाण्याचे सेवन करू शकता. यामुळे शरीरावर वाढलेली अतिरिक्त चरबी कमी होईल आणि आराम मिळेल.

रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी दालचिनीच्या पाण्याचे सेवन करा. दालचिनीचे पाणी अनेक आजारांवर प्रभावी आहे.

थंडीमध्ये सर्दी, खोकला इत्यादी समस्या वाढू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी दालचिनीच्या काढ्याचे किंवा दालचिनीच्या पाण्याचे सेवन करावे. यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होईल.

दालचिनीमध्ये असलेले गुणधर्म सांधे दुखीपासून आराम मिळवून देण्यासाठी मदत करतात. तसेच शरीरातील अळसपणा यामुळे कमी होतो.






