सणवारांच्या दिवसांमध्ये सर्वच स्त्रिया हातांवर मेहेंदी काढतात. मेहेंदीशिवाय सणवार किंवा कोणताही सोहळा पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. श्रावण महिन्यात सगळीकडे मंगळागौर साजरा केली जाते. पारंपरिक नऊवारी साडी, सोन आणि मोत्याचे दागिने घालून नवविवाहित स्त्रियांची मंगळागौर साजरा केली जाते. त्यामुळे हातांवर मेहेंदी काढल्यानंतर मंगळागौरीचा लुक पूर्ण होतो. मेहेंदी हातांच्या सौंदर्यात भर घालते. त्यामुळे या पारंपरिक आणि मनमोहक डिझाईनची मेहेंदी हातांवर नक्की काढा. (फोटो सौजन्य – pinterest)
मंगळागौरीच्या सणाला मेहेंदीने सजवा हात! 'या' लेटेस्ट आणि मनमोहक डिझाईन सौंदर्यात पडतील भर

मंगळागौरीच्या दिवशी देवी पार्वतीची पूजा करून वैवाहिक जीवनात सुख, सौख्य आणि दीर्घायुष्याची प्रार्थना केली जाते. त्यामुळे हातांवर तुम्ही शिव आणि पार्वतीची प्रतिकृती काढू शकता.

भरगच्च मेहेंदी काढायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. त्यामुळे हातांवर तुम्ही कमळ,नाजूक डिझाईनची फुले किंवा हत्ती सुद्धा काढू शकता.

हल्ली सर्वच महिलांना मिनिमल मेहेंदी काढायला खूप जास्त आवडते. या डिझाईनची मेहेंदी सर्वच कार्यक्रमांसाठी परफेक्ट आहे. नाजूक कमळ आणि ठिपके देऊन काढलेली मेहेंदी सणावारांची शोभा वाढवते.

सोशल मीडियावर मेहेंदीच्या नवनवीन डिझाईन कायमच व्हायरल होत असतात. त्यामुळे या डिझाईनची मेहेंदी हातांवर काढू शकता. मेहेंदीचा रंग गडद करण्यासाठी मेहेंदी काढून झाल्यानंतर साखरपाणी लावावे.

कामाच्या धावपळीमध्ये बऱ्याचदा मेहेंदी काढण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. अशावेळी अरेबिक डिझाईनची मेहेंदी उत्तम पर्याय आहे.






