थंडीच्या दिवसांमध्ये आहारात करा पांढऱ्या शुभ्र मुळ्याचे सेवन, आरोग्यासोबतच सौंदर्यात सुद्धा पडेल भर

हिवाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात वेगवेगळ्या पारंपरिक भाज्या उपलब्ध होतात. त्यात प्रामुख्याने पालेभाज्यांचा समावेश असतो. पालेभाज्या खाल्ल्यामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतात. त्यातील अतिशय गुणकारी भाजी म्हणजे पांढऱ्या रंगाचा मुळा. पोटॅशियम आणि अँथोसायनिन, विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक असतात. याशिवाय मुळ्यामध्ये ९३% पेक्षा जास्त पाणी, फायबर असते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया थंडीच्या दिवसांमध्ये मुळा खाण्याचे फायदे.(फोटो सौजन्य – istock)
थंडीच्या दिवसांमध्ये आहारात करा पांढऱ्या शुभ्र मुळ्याचे सेवन

Updated on: 
पांढरा शुभ्र मुळा थंडीच्या दिवसांमध्ये आवडीने खाल्ला जातो. अनेक लोक उग्र वासामुळे मुळा खाणे टाळतात. पण आहारात सॅलड किंवा मुळ्याची भाजी बनवून खाऊ शकता.

मुळ्यामध्ये असलेल्या फायबरमुळे आतड्यांची हालचाल सुरळीत राहते आणि बद्धकोष्ठता, अपचनाच्या समस्यांपासून सुटका मिळते. त्यामुळे आहारात आवर्जून मुळ्याचे सेवन करावे.

मुळा खाल्ल्यामुळे चांगल्या प्रमाणात फायबर, विटामिन सी आणि पोटॅशियम युक्त घटक घटक शरीराला मिळतात. यामुळे शरीराची ऊर्जा वाढते आणि आरोग्य सुधारते.

थंडीच्या दिवसांमध्ये अनेकांना बद्धकोष्ठता किंवा अपचनाचा त्रास कायमच होतो. अशावेळी आठवड्यातून दोनदा मुळ्याच्या भाजीचे सेवन करावे. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात.

कमी कॅलरीज आणि जास्त पाणी, फायबर असल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. अँथोसायनिनसारखे घटक रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.