Gold Price Outlook : सोनं 1 लाखांच्या खाली येणार? पुढील 6 महिन्यांत 'या' रेंजमध्ये राहणार भाव
Gold Price Outlook : गेल्या काही काळात सोन्याच्या दरांत मोठी घसरण आणि त्यानंतर सुधारणा पाहायला मिळाली आहे. यामुळे सोन्याचे भाव १ लाख रुपयांच्या खाली जाणार का, असा प्रश्न गुंतवणूकदारांना पडला आहे. ( सौजन्य - Pinterest )
सोनं 1 लाखांच्या खाली येणार? एक्सपर्टनी थेट सांगितलं; पुढील 6 महिन्यांत 'या' रेंजमध्ये राहणार भाव
नोव्हेंबरमध्ये एमसीएक्सवर सोन्याचे भाव सुमारे १३% घसरले असले, तरी तळाच्या पातळीवरून दरांमध्ये पुन्हा सुधारणा दिसून आली आहे.
तज्ज्ञांच्या मते, सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १ लाख रुपयांच्या खाली जाण्याची शक्यता कमी असून, व्याजदरात संभाव्य कपातीमुळे किमतींना आधार मिळू शकतो.
२६ नोव्हेंबर रोजी सोने प्रति १० ग्रॅम ₹१,१७,९०६ पर्यंत घसरले होते, मात्र त्यानंतर झपाट्याने सावरत ₹१,२६,२५१ च्या उच्चांकावर पोहोचले.
अमेरिकेतील रोजगार आणि घरविक्रीचे सकारात्मक आकडे तसेच २०२७ च्या पहिल्या तिमाहीत संभाव्य व्याजदर कपातीमुळे दीर्घकालीन तेजीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पुढील सहा महिन्यांत सोने स्थिर राहून प्रति १० ग्रॅम ₹१,१२,००० ते ₹१,३५,००० च्या मर्यादेत व्यवहार करेल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.