• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Diwali Bhaubeej 2024 Auspicious Muhurat Significance History

भाऊबीज हा सण का साजरा केला जातो? जाणून घ्या शुभ मुहूर्त, इतिहास, महत्त्व

भाऊ-बहिणीच्या नात्याचे प्रतीक मानला जाणारा सण म्हणजे भाऊबीज. हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी बहीण भावाला टिलक लावून ओवाळते व त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 02, 2024 | 10:48 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भाऊबीज हा सण भाऊ-बहिणीच्या नात्याचे प्रतीक मानला जातो. गोवर्धन पूजेनंतर हा सण साजरा केला जातो. या शुभ प्रसंगी बहिणी आपल्या भावांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुख-समृद्धी वाढवण्याच्या कामना करतात आणि भाऊ आपल्या बहिणींना भेटवस्तू देतात आणि जीवनात त्यांचे रक्षण करण्याचे वचन देतात.

दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीज हा सण साजरा केला जातो. याला यम द्वितीया असेही म्हणतात. हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या विशेष प्रसंगी बहिणी आपल्या भावाला टिळक लावतात आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करतात. भाऊबीज हा सण का साजरा केला जातो माहीत आहे का? जाणून घ्या

भाऊबीज शुभ मुहूर्त

भाऊबीजेची तिथी शनिवार, 2 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजून 21 मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ती रविवार, 3 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजून 6 मिनिटांनी समाप्त होईल. उदय तिथीनुसार भाऊबीज रविवार 3 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाईल. तसेच या दिवशी सकाळी 11 वाजून 39 मिनिटांपर्यंत सौभाग्य योग राहील. त्यानंतर शोभन योग लागेल. त्यामुळे भाऊबीजेसाठी 11 वाजून 46 मिनिटांपर्यंत सर्वोत्तम मुहूर्त असेल.

हेदेखील वाचा- Bhaubeej 2024: भावाला दीर्घायुष्य लाभण्यासाठी करा ‘ही’ आरती

भाऊबीजेचे महत्त्व

हिंदू धर्मात भाऊबीज हा सण प्रमुख आणि प्रसिद्ध सणांमध्ये केली जाते. भाऊबीजेचा सण हा बहीण आणि भावाचा सण आहे. या दिवशी लोक आपल्या भावंडांसोबत साजरे करतात. ते एकमेकांना भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात आणि एकमेकांवर खूप प्रेम करतात. हा सण आपल्याला सर्व प्रकारच्या वाईट शक्तीपासून वाचण्यासाठी आणि आपल्याला समृद्धी आणि दीर्घायुष्य प्रदान करण्यासाठी होतो.

हेदेखील वाचा- या गोष्टी घरात ठेवल्याने वास्तूदोष होईल दूर, जाणून घ्या फेंगशुई संबंधित उपाय

भाऊबीजेचा इतिहास

पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी मृत्यूचा देव यमराज हा त्याची बहीण यमुनेकडे तिने अनेक वेळा बोलावल्यानंतर तिच्या भेटीला गेला होता. यमुनेने यमराजाला भोजन दिले आणि त्याचे औक्षण केले आणि त्याच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना केली. यानंतर यमराजाने प्रसन्न होऊन बहीण यमुनेला वरदान मागण्यास सांगितले. यमुना म्हणाली की, तू दरवर्षी या दिवशी माझ्या घरी ये आणि या दिवशी जी बहीण आपल्या भावाला औक्षण करील, ती तुला घाबरणार नाही. यमराजाने यमुनेला तसे वरदान दिले आणि याच दिवसापासून भाऊबीज उत्सवाला सुरुवात झाली, असे मानले जाते.

बहीण भावाचे नाते वृद्धींगत होवो

भाऊबीजच्या दिवशी बहिणीच्या किंवा स्वतःच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस आणि नंतर भावाला ओवाळते. मग भाऊ ताटात बहिणीला ओवाळणी देतो. काही ठिकाणी चित्रगुप्ताची पूजा या दिवशी केली जाते. बहीण भावाच्या नातेसंबंधाचा धागा दृढ करणारा दिवस अशी ‘भाऊबीजे’ची ओळख आहे.

Web Title: Diwali bhaubeej 2024 auspicious muhurat significance history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2024 | 10:48 AM

Topics:  

  • Diwali
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Zodiac Sign: सूर्यदेवाच्या आशीर्वादाने अमला योगाचा शुभ संयोग, कर्क राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदा
1

Zodiac Sign: सूर्यदेवाच्या आशीर्वादाने अमला योगाचा शुभ संयोग, कर्क राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदा

Zodiac Sign: बुधादित्य योगाच्या शुभ संयोगाने मकर राशीसह या राशीच्या लोकांना होणार अधिक फायदा
2

Zodiac Sign: बुधादित्य योगाच्या शुभ संयोगाने मकर राशीसह या राशीच्या लोकांना होणार अधिक फायदा

Zodiac Sign: प्रदोष व्रत आणि सिद्ध योगाचा शुभ संयोग, वृषभ राशीसह या राशीच्या लोकांना होणार लाभ
3

Zodiac Sign: प्रदोष व्रत आणि सिद्ध योगाचा शुभ संयोग, वृषभ राशीसह या राशीच्या लोकांना होणार लाभ

Guru Gochar: गुरु ग्रह बदलणार आपले नक्षत्र, या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब
4

Guru Gochar: गुरु ग्रह बदलणार आपले नक्षत्र, या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब

ताज्या बातम्या

पुढे वाचा
आपल्या खेळीने मैदान गाजवणारा वेस्ट इंडीज खेळाडू ख्रिस गेलचा वाढदिवस; जाणून घ्या 21 सप्टेंबर

आपल्या खेळीने मैदान गाजवणारा वेस्ट इंडीज खेळाडू ख्रिस गेलचा वाढदिवस; जाणून घ्या 21 सप्टेंबर

Beed Crime: आज माझा वाढदिवस, तुझा मूळशी पॅटर्न करतो! अंबाजोगाईत तरुण व्यापाऱ्यावर लोखंडी कत्तीनं हल्ला

Beed Crime: आज माझा वाढदिवस, तुझा मूळशी पॅटर्न करतो! अंबाजोगाईत तरुण व्यापाऱ्यावर लोखंडी कत्तीनं हल्ला

International Day of Peace : ‘No War, Only Peace’; युद्धाच्या गडद अंधारातून शांततेकडे घेऊन जाणारा एक सोनेरी प्रकाश

International Day of Peace : ‘No War, Only Peace’; युद्धाच्या गडद अंधारातून शांततेकडे घेऊन जाणारा एक सोनेरी प्रकाश

Surya Grahan 2025: वर्षाचं शेवटचं सूर्यग्रहण स्मार्टफोनवर कसं बघू शकता लाईव्ह? या आहेत सोप्या स्टेप्स

Surya Grahan 2025: वर्षाचं शेवटचं सूर्यग्रहण स्मार्टफोनवर कसं बघू शकता लाईव्ह? या आहेत सोप्या स्टेप्स

H-1B Visa : ट्रम्प यांचा $100,000 व्हिसा शुल्क नियम आजपासून होणार लागू; भारतीयांना बसणार फटका

H-1B Visa : ट्रम्प यांचा $100,000 व्हिसा शुल्क नियम आजपासून होणार लागू; भारतीयांना बसणार फटका

पहिल्यांदाच BCCI च्या अध्यक्षपदी मिथुन मनहास यांची होणार निवड? भारतीय क्रिकेटमध्ये बजावणार महत्त्वाची भूमिका

पहिल्यांदाच BCCI च्या अध्यक्षपदी मिथुन मनहास यांची होणार निवड? भारतीय क्रिकेटमध्ये बजावणार महत्त्वाची भूमिका

अल्झायमर म्हणजे काय? गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर सुरुवातीला दिसून येतात ‘ही’ लक्षणे

अल्झायमर म्हणजे काय? गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर सुरुवातीला दिसून येतात ‘ही’ लक्षणे

व्हिडिओ

पुढे बघा
Latur : प्राथमिक अंदाज धडकी भरवणारा, तीन लाख हेक्टर क्षेत्रावरील पीक पाण्यात

Latur : प्राथमिक अंदाज धडकी भरवणारा, तीन लाख हेक्टर क्षेत्रावरील पीक पाण्यात

Jaalna : समृद्धी महामार्गाला जमीन देण्यास शेतकऱ्यांचा विरोध

Jaalna : समृद्धी महामार्गाला जमीन देण्यास शेतकऱ्यांचा विरोध

Sambhajinagar News : Sanjay Kenekar यांच्या शिष्टाईमुळे बंजारा समाजाचे उपोषण मागे

Sambhajinagar News : Sanjay Kenekar यांच्या शिष्टाईमुळे बंजारा समाजाचे उपोषण मागे

Kalyan News : नवरात्रौत्सव काळात कल्याण शहरात अवजड वाहनांना प्रवेशबंदी

Kalyan News : नवरात्रौत्सव काळात कल्याण शहरात अवजड वाहनांना प्रवेशबंदी

Beed Rain : बीडच्या देवळाली गावातील नुकसानग्रस्त शेतीचे भेसूर वास्तव

Beed Rain : बीडच्या देवळाली गावातील नुकसानग्रस्त शेतीचे भेसूर वास्तव

BADLAPUR : ‘पडळकरांची जीभ छाटणाऱ्याला 5 लाख रुपयांचे बक्षीस’, अविनाश देशमुखांची घोषणा

BADLAPUR : ‘पडळकरांची जीभ छाटणाऱ्याला 5 लाख रुपयांचे बक्षीस’, अविनाश देशमुखांची घोषणा

JAMKHED : नगरपरिषदेच्या भोंगळ कारभारावर रोहित पवारांनी अधिकाऱ्यांना झापले

JAMKHED : नगरपरिषदेच्या भोंगळ कारभारावर रोहित पवारांनी अधिकाऱ्यांना झापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.