Kaal Bhairav Jayanti 2026: कधी आहे कालभैरव जयंती, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि धार्मिक महत्त्व

Kaal Bhairav Jayanti 2026: भगवान शिवाच्या मुख्य रूपांपैकी एक असलेले कालभैरव. हिंदू धर्मामध्ये कालभैरव जयंतीला विशेष महत्त्व आहे. कालभैरव जयंती कधी आहे, मुहूर्त, पूजा पद्धत आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या
कधी आहे कालभैरव जयंती, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत
कधी आहे कालभैरव जयंती, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत
Published on: 
Updated on: 
  • मंगळवार, १ डिसेंबर रोजी कालभैरव जयंती आहे

  • कालभैरव जयंतीच्या दिवशी पूजा करण्याची पद्धत

  • कालभैरव जयंतीचे धार्मिक महत्त्व

भगवान शिवाच्या प्रमुख अवतारांपैकी एक असलेल्या काळभैरवाला समर्पित काळभैरव जयंतीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. हा सण भैरव अष्टमी म्हणूनही ओळखली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी भगवान शिव काळभैरवाच्या रूपात प्रकट झाले आणि त्यांनी अधर्माचा अंत करण्याचा संदेश दिला.

या दिवशी भक्त कालभैरवाची पूजा करतात आणि सुख, शांती व धैर्यासाठी प्रार्थना करतात. कालभैरव जयंती कधी आहे, मुहूर्त, पूजा पद्धत आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

कालभैरव जयंती कधी आहे

पंचांगानुसार, कालभैरव जयंती मंगळवार, १ डिसेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. हा दिवस मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाची अष्टमी तिथी असेल. अष्टमी तिथी १ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२:११ वाजता सुरू होईल आणि रात्री ११:१३ पर्यंत चालेल.

कधी आहे कालभैरव जयंती, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत
Ganga Godavari Temple: १२ वर्षांनीच भाविकांसाठी उघडते गंगा गोदावरी मातेचे मंदिर; जाणून घ्या ७०० वर्षांचा इतिहास

कालभैरव जयंतीच्या दिवशी पूजा करण्याची पद्धत

या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून देव्हारा स्वच्छ करावे. दिवे, धूप आणि फुले अर्पण करून भगवान शिव आणि बाबा कालभैरव यांचे ध्यान करावे. त्यानंतर काळभैरवाच्या मंत्रांचा जप करावा आणि काळभैरव अष्टकम् किंवा चालिसेचे पठण करावे. संध्याकाळी भक्त आपापल्या परंपरेनुसार पूजा आणि आरती देखील करतात.

कालभैरव जयंतीचे धार्मिक महत्त्व

पौराणिक कथेनुसार, काळभैरव हे भगवान शिवाचे एक शक्तिशाली रूप आहे. त्यांना काळाचे स्वामी आणि काशीचे कोतवाल म्हणूनही ओळखले जाते. धार्मिक परंपरेनुसार, त्यांची उपासना धैर्य, शिस्त आणि सत्पथाचे अनुसरण करण्याच्या प्रेरणेशी जोडलेली आहे. भक्त या दिवशी बाबा काळभैरवांचे स्मरण करतात आणि आपल्या जीवनात सुख, शांती आणि ज्ञानासाठी प्रार्थना करतात.

कधी आहे कालभैरव जयंती, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत
December Horoscope: डिसेंबरमध्ये या राशींच्या लोकांवर होणार लक्ष्मीची कृपा, लक्ष्मी नारायण योगामुळे मिळणार आर्थिक लाभाच्या संधी

कालभैरवाला कोणत्या गोष्टींचा नैवेद्य दाखवावा

धार्मिक परंपरेनुसार कालभैरवाला फुले, नारळ, फळे, मिठाई आणि इतर आध्यात्मिक वस्तू अर्पण केल्या जातात. काही ठिकाणी उडीद डाळीपासून बनवलेले पदार्थ यांचाही नैवेद्यात समावेश असतो. मोहरीच्या तेलाचा दिवा लावण्याची परंपराही प्रचलित आहे. पूजेच्या वेळी आपल्या कौटुंबिक परंपरा आणि मंदिराच्या नियमांचे पालन करावे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)