फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रात गुरु ग्रह हा अत्यंत शुभ ग्रह मानला जातो. तो ज्ञान, भाग्य, धर्म, संपत्ती आणि आध्यात्मिक उन्नतीचा कारक आहे. कुंडलीत गुरु मजबूत असेल तर व्यक्तीला जीवनात यश, सन्मान आणि स्थैर्य मिळते. पण जर गुरु कमजोर असेल, तर अडथळे, आर्थिक अडचणी आणि निर्णयक्षमतेचा अभाव जाणवू शकतो.
तुमचा कुंडलीतील गुरू ग्रह मजबूत आहे का? हे ओळखणं ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्वाचं मानलं जातं. कारण बृहस्पति ग्रह हा ज्ञान, भाग्य, पैसा आणि सन्नान यांचा कारक आहे. जसे आयुष्यात गुरू महत्त्वाचे असतात तसे चांगल्या आयुष्यासाठी गुरू ग्रह महत्त्वाचा असतो. गुरू ग्रह मजबूत असणे का महत्त्वाचे असते ते जाणून घेऊया
जर तुमचा बृहस्पति ग्रह मजबूत असेल तर तुम्ही घेतलेले निर्णय बहुतेक वेळा योग्य निघतात. अशा लोकांना शिकायला आवडतं आणि नवीन गोष्टी त्यांना पटकन समजतात. गुरू चांगला असेल तर पैसा आणि भाग्य देखील साथ देतं. कमाई हळूहळू का होईना वाढते आणि योग्य वेळी संधी देखील मिळते. गुरू चांगला असेल तर तुम्हाला समाजात मान सन्मान मिळतो. लोक तुमचं ऐकतात. गुरू मजबूत असणाऱ्या लोकांचं मन शांत आणि सकारात्मक असतं. अशा व्यक्ती धार्मिक आणि अध्यात्मिक अधिक असतात. तर ज्यांचा गुरू कमकुवत आहे अशा लोकांचे निर्णय मात्र सतत चुकतात. त्यांना शिक्षणात अडथळे येतात. पैसा टिकत नाही किंवा अनपेक्षित खर्च वाढत राहतो. मनात शंका, भीती आणि नकारात्मक विचार जास्त येतात. योग्य गुरू किंवा मार्गदर्शक मिळत नाही किंवा त्यांचा ऐकूनही फायदा होत नाही. असे तुमच्याही बाबतीत होत असेल तर तुमचा गुरू कमकुवत असू शकतो.
गुरूवारी पिवळे कपडे वापरा
ओम बृहस्पति नमः या मंत्रांचा जप करा
हरभरा डाळ, हळद दान करा
शिक्षक आणि वडिलधाऱ्यांचा आदर करा.
दानधर्म आणि गरजू लोकांना मदत केल्याने पुण्य मिळते आणि गुरु ग्रह अनुकूल होतो.
करिअरमध्ये प्रगती आणि यश
आर्थिक स्थैर्य आणि धनलाभ
चांगली निर्णयक्षमता
कुटुंबात आनंद आणि सौहार्द
आध्यात्मिक प्रगती आणि मनःशांती
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: गुरुवारी व्रत करणे, मंत्रजप करणे, पिवळ्या वस्तूंचे दान करणे आणि चांगले आचरण ठेवणे.
Ans: गुरुवार हा गुरु ग्रहाचा दिवस मानला जातो.
Ans: करिअरमध्ये यश, आर्थिक स्थैर्य, चांगली निर्णयक्षमता आणि सन्मान मिळतो






