CSK part ways with mike Hussey
आयपीएल २०२७ च्या आधी सीएसकेमध्ये अनेक बदल होत आहेत. वृत्तानुसार, चेन्नई सुपर किंग्स व्यवस्थापनाने पुढील हंगामापूर्वी मायकल हसीला फलंदाजी प्रशिक्षक पदावरून हटवण्याचा निर्णय अधिकृतपणे जाहीर केला आहे.हसीने अनेक वर्षे सीएसकेसाठी क्रिकेट खेळले आणि त्यानंतर २०१८ मध्ये तो फलंदाजी प्रशिक्षक म्हणून संघात सामील झाला. तेव्हापासून तो याच भूमिकेत चेन्नई सुपर किंग्ससोबत होता.
आयपीएल २०२६ नंतर स्टीफन फ्लेमिंग यांचा चेन्नई सुपर किंग्समधील कार्यकाळ संपला. त्यांच्या जागी झहीर खान यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर, सीएसकेने झहीर खान यांना स्वतःचा कोचिंग स्टाफ तयार करण्याचे स्वातंत्र्य दिल्याचे वृत्त समोर आले. झहीर खान व्यतिरिक्त, मोहित शर्मा देखील सीएसकेमध्ये सामील झाला आहे. चेन्नई सुपर किंग्सने गोलंदाजी प्रशिक्षक एरिक सायमन यांना हटवून माजी भारतीय वेगवान गोलंदाज मोहित शर्मा यांची नवीन गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. वृत्तानुसार, सीएसकेचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक जेम्स फॉस्टर यांचे भवितव्यही धोक्यात आले आहे. ते देखील फ्रँचायझी सोडून जाण्याची शक्यता आहे.
स्टीफन फ्लेमिंगने सीएसकेची साथ सोडल्यानंतर, इंग्लंड कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षकपदाची भूमिका स्वीकारली. आता हसी देखील इंग्लंड कसोटी संघाच्या प्रशिक्षण स्टाफमध्ये सामील होऊ शकतो अशा चर्चांना उधाण आले आहे. २०२२ च्या आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषकासाठी इंग्लंडसोबत सल्लागार म्हणून काम केले होते आणि त्यांच्या विजयात योगदान दिले होते.
IND A vs AUS A: टीम इंडियाची फलंदाजी ढेपाळली! ऑस्ट्रेलियाने पुन्हा चारली धूळ; भारताचा दारुण पराभव






