भारत विरुद्ध झिम्बाब्वे सिरिज (फोटो- सोशल मिडिया)
उद्यापासून सुरू होणार भारत विरुद्ध झिम्बाब्वे सिरिज
स्मृती मंधाना करणार भारतीय महिला संघाचे नेतृत्व
दोन्ही संघांमध्ये खेळवली जाणार तीन सामन्यांची सिरिज
IND Vs ZIM: भारतीय संघ लवकरच झिम्बाब्वेविरुद्ध वनडे आणि टी 20 सामन्यांची सिरिज खेळणार आहे. उद्यापासून छत्तीसगडच्या रायपुरमध्ये तीन टी 20 सामन्यांची सिरिज खेळवली जाणार आहे. हरमनप्रीत कौरने राजीनामा दिल्यानंतर भारतीय महिला संघाची धुरा आता स्मृती मंधानाकडे असणार आहे. स्मृतीच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. सिरिज जिंकून कर्णधार म्हणून विजयी सुरुवात करण्याचा प्रयत्न स्मृतीचा असणार आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघात एक मोठा बदल पाहायला मिळत आहे. हरमनप्रीत कौर यांनी कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर, संघाची धुरा आता स्टार फलंदाज स्मृती मानधना यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. स्मृती मानधना आपल्या या नव्या प्रवासाची आणि कर्णधारपदाची सुरुवात उद्यापासून होणार आहे.
स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखाली Team India सज्ज! रायपूरमध्ये IND Vs ZIM टी-20 मालिकेचा थरार
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे यशस्वी नेतृत्व करताना स्मृती मानधनाने आपल्या कप्तानीखाली संघाला दोन वेळा महिला प्रीमियर लीग (WPL) चे विजेतेपद मिळवून दिले आहे. या लीगमधील तिच्या उत्कृष्ट नेतृत्वाचा आणि अनुभवाचा फायदा आता भारतीय राष्ट्रीय संघाला पुढे नेण्यासाठी होईल, ज्याची संपूर्ण जबाबदारी आता तिच्या हाती असणार आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाची नवीन कर्णधार स्मृती मानधना सध्या शानदार फॉर्ममध्ये खेळत आहे. ती सध्या महिला क्रिकेटच्या टी-२० इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स करणारी फलंदाज म्हणून समोर आली आहे. तिने आतापर्यंत १७९ T-20I सामने खेळले आहेत. यामध्ये तिने ४,८६७ रन्स केल्या आहेत.
भारतीय संघ: स्मृती मंधाना (कर्णधार), शेफाली वर्मा (उपकर्णधार), निकी प्रसाद, हरमनप्रीत कौर, अनुष्का शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), जी कमलिनी (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, प्रेमा रावत, श्री चरणी, नंदनी शर्मा, क्रांती गौड, अरुंधती रेड्डी, जिंतिमणी कलिता आणि मिन्नू मणी.
झिम्बाब्वेचा संघ; जोसेफिन न्कोमो (कर्णधार), बिलेव्ड बिज़ा, चिपो मुगेरी-तिरिपानो, केलिस न्धलोवु, मिशेल मावुंगा, फ्रांसिस्का चिपारे, ओलिंडर चारे, कुदजाई चिगोरा, न्याशा ग्वांजुरा, नोमवेलो सिबांडा, लॉरिन फिरी, चियेड्जा धुरुरु, मोडेस्टर मुपाचिकवा, टेंदाई माकुशा आणि शार्ने मेयर्स.
IND Vs ZIM: वाघिणी झिम्बाब्वेविरुद्ध भिडणार अन् फाडणार; BCCI ने केली टीम इंडियाची घोषणा






