

नवी दिल्ली : भारतातील आघाडीची मल्टिप्लेक्स चेन आयनॉक्स लीझर लिमिटेडने (Multiplex Chain INOX Leisure Limited आज जाहीर केले की, जगातील सर्वांत मोठी फुटबॉल स्पर्धा फिफा वर्ल्ड कप कतार 2022 (Fifa World Cup Qutar) मधील सामने आपल्या 15 शहरांतील 22 मल्टिप्लेक्सेसमधून दाखवण्याची संपूर्ण तयारी झाली आहे.
फुटबॉलचे चाहते आता मुंबई, दिल्ली, गुरगाव, कोलकाता, पुणे, गोवा, भुवनेश्वर, जयपूर, सिलिगुरी, सुरत, इंदोर, बडोदा, धनबाद व त्रिसूरमधील आयनॉक्स मल्टिप्लेक्सेसमध्ये सामन्यांचे थेट प्रक्षेपण बघू शकतात.
लाइव्ह सामने दाखवण्यासाठी आयनॉक्सने घेतलेल्या पुढाकारामुळे फुटबॉल चाहत्यांना स्टेडियममध्ये असते तसे चैतन्य उत्सवी वातावरणात आपल्याच सारख्या चाहत्यांच्या साथीने अनुभवण्याची मुभा मिळेल. सिनेमा थिएटर्समधील धांदल व चैतन्यामुळे चाहत्यांची गर्दी वाढेल आणि सिनेमा लॉबींमध्ये केलेल्या उत्सवी सजावटीमुळे फुटबॉलप्रेमींना वर्ल्डकपच्या काही अविस्मरणीय स्मृती मिळू शकतील.
सिनेमाहॉलमधील आरामदायी वातावरण तसेच वैयक्तिक स्वच्छता व सुरक्षिततेची घेतली काळजी यांमुळे चाहत्यांचा फुटबॉल बघण्याचा अनुभव अधिक चांगला होईल आणि ते आपल्या आवडत्या टीमसाठी चीअर करू शकतील. या अजोड ऊर्जेच्या जोडीने चाहत्यांना आयनॉक्सच्या भव्य अशा फूड-कॉम्बोजचा आणि चविष्ट गोर्मे खाद्यपदार्थांचाही आस्वाद घेता येणार आहे. लाइव्ह सामने बघणाऱ्या चाहत्यांसाठी मल्टिप्लेक्सेस हे सर्व उपलब्ध करून देणार आहेत.
फिफा वर्ल्ड कप कतार 2022 ही स्पर्धा 20 नोव्हेंबर रोजी सुरू झाली आहे, तर राउंड ऑफ 16 डिसेंबरपासून सुरू होत आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना (फायनल) 18 डिसेंबर रोजी होणार आहे. मागील वर्ल्ड कप स्पर्धा 2018 मध्ये रशियात झाली होती. त्यानंतर चार वर्षे फुटबॉलप्रेमी या स्पर्धेची प्रतीक्षा करत होते.
आंतरराष्ट्रीय संघांपैकी 32 सर्वोत्तम संघांना वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली असून, ते या प्रतिष्ठेच्या विजेतेपदासाठी झुंजत आहेत. फुटबॉलचे चैतन्य साजरे करण्यासाठी फिफा वर्ल्ड कपला समर्पित सॉकरशी निगडित घटक असलेला लोगो विकसित करून चाहत्यांना वैशिष्ट्यपूर्ण अनुभव देण्यासाठी आयनॉक्स सज्ज आहे. आयनॉक्स सिनेमा लॉबींमध्येही फुटबॉलप्रेमींसाठी अनोखे अनुभवात्मक उपक्रम विकसित करणार आहे. जेणेकरून, चाहते त्यांच्या आवडत्या संघाला जोशात पाठिंबा देऊ शकतील.
आयनॉक्स लीझर लिमिटेडचे चीफ एग्झिक्युटिव ऑफिसर (मुख्य कार्यकारी अधिकारी) अलोक टंडन म्हणाले, “काही विशिष्ट गोष्टी आपल्या देशातील लोकांना नेहमीच एकत्र आणतात आणि क्रीडा ही त्यातील एक गोष्ट आहे. फिफा वर्ल्ड कप कतार 2022 ही अशीच एक बहुप्रतिक्षित क्रीडास्पर्धा आयनॉक्समधील आमच्या मोठ्या सिनेमा स्क्रीन्सवर आणणे आमच्यासाठी थरारक अनुभव आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही आमच्या प्रेक्षकांना अविस्मरणीय अनुभव व स्मृती मनात साठवण्याची संधी देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याचप्रमाणे स्टेडियममध्ये सामना बघत असल्याचा रोमहर्षक अनुभवही आम्ही त्यांना देणार आहोत. आमचा कॉण्टेण्टमधील नवोन्मेषाचा प्रवास या ऐतिहासिक स्क्रीनिंगच्या माध्यमातून पुढे नेता आला याचा आम्हाला अभिमान वाटतो. आम्ही आमच्या पाहुण्यांचे स्वागत करण्यास आणि त्यांना आयनॉक्समध्ये फुटबॉल बघण्याच्या अनुभवात बुडून जाण्याची संधी देण्यास आम्ही उत्सुक आहोत."
भारतात क्रीडाप्रकारांचे स्क्रीनिंग व प्रमोशन करण्यात आयनॉक्स कायमच अग्रेसर राहिले आहे. अलीकडेच या सिनेमा चेनने अनेकविध क्रीडास्पर्धांना सहाय्य करण्यासाठी करार केले आहेत. यांमध्ये क्रिकेट, टेबल टेनिस, फुटबॉल, बॅडमिंटन, बास्केटबॉल आदी क्रीडाप्रकारांतील विविध संघ तसेच लीग्जचा समावेश होतो. प्रभावी प्रमोशनल उपक्रमांच्या माध्यमातून लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचाही आयनॉक्सचा प्रयत्न आहे. आयनॉक्स भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अधिकृत प्रायोजक आहेत. अलीकडेच आयनॉक्सने आशिया कप स्पर्धेतील सामन्यांचे तसेच आयसीसी टी20 मेन्स वर्ल्ड कप 2022मधील सामन्यांचे थेट प्रसारण करून चाहत्यांना तसेच खऱ्याखुऱ्या क्रिकेटप्रेमींना क्रिकेट बघण्याचा अजोड अनुभव देण्यासाठी आपल्या सिनेमा थिएटर्समध्ये एकत्र आणले होते.
चाहते आयनॉक्स सिनेमांमध्ये त्यांच्या आवडत्या संघांमधील थरार उलगडताना बघू शकतील आणि त्यांच्यासाठी चीअरही करू शकतील.
स्टेडियममध्ये असते तशी चाहत्यांची गर्दी आणि रोमांचक फूड-कॉम्बोज व गॉर्मे खाद्यानुभवासह फुटबॉल बघण्याचा अजोड अनुभव आयनॉक्स देऊ करत आहे.
आयनॉक्स आपल्या लोगोमध्ये सॉकरशी निगडित घटकाची भर घालून वर्ल्ड कपचे स्वागत करत आहे.