पंतप्रधान नरेंद्र मोदी (फोटो- ट्विटर)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच राजधानी नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर, जपानमधील ‘आइची-नागोया’ येथे पार पडलेल्या एशियन गेम्स स्पर्धा 2026 मध्ये मधील भारतीय पदकविजेत्या खेळाडूंसोबत संवाद साधत त्यांचे अभिनंदन केले. या ऐतिहासिक भेटीदरम्यान खेळाडूंचा उत्साह वाढवत पंतप्रधानांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.यंदाच्या एशियन गेम्समध्ये भारताने आतापर्यंतची सर्वोत्तम आणि ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे.
Asian Gamesच्या ‘सुवर्ण’वीरांना पंतप्रधान मोदींचे मोठे सरप्राईज; १५ ऑक्टोबरला थेट…
Our Asian Games champions have made the Tricolour fly high! Their achievements show what passion, perseverance and belief can achieve. https://t.co/m3gOPecQCo — Narendra Modi (@narendramodi) October 15, 2026
एशियन गेम्स २०२६ मध्ये भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत क्रीडाविश्वात नवा इतिहास रचला आहे. या बहुप्रतिष्ठित स्पर्धेत भारतीय संघाने उत्कृष्ट खेळ करत एकूण ८५ पदकांची कमाई केली असून, पदकतालिकेत भारताने चौथे स्थान पटकावले आहे. भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत आपल्या अफाट कौशल्याचे प्रदर्शन करत २१ गोल्ड, 27 रौप्य आणि 37 कांस्य पदके जिंकली आहेत.






