पंतप्रधान नरेंद्र मोदींचा व्हिडिओ व्हायरल (फोटो- ट्विटर)
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ शेयर केला आहे आणि राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी मेजर ध्यानचंद यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान मोदी आपल्या व्हीडिओत नेमके काय म्हणाले आहेत, ते जाणून घेऊयात.
National Sports Day 2026: आज राष्ट्रीय क्रीडा दिन; जाणून घ्या २९ ऑगस्टचा इतिहास..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित एक खास व्हिडिओ शेयर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेजर ध्यानचंद यांना श्रद्धाजली वाहिली असून, त्यांनी त्यांची खेळाच्या प्रती असलेली प्रतिभा आणि निष्ठा येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असे व्हिडिओत म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांनी क्रीडा क्षेत्रातील सर्वांच्या कठोर मेहनतीची आणि दृढ निश्चयाची प्रशंसा देखील केली आहे.
To every sports lover…your dedication, passion and determination make everyone proud. We also pay homage to the legendary Major Dhyan Chand Ji, whose brilliance inspires generations.#NationalSportsDay pic.twitter.com/uwzxCWPmuW — Narendra Modi (@narendramodi) August 29, 2026
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित शुभेच्छा दिल्या. मेजर ध्यानचंद यांना स्मरण करून उपराष्ट्रपती म्हणाले, ‘हा दिवस कठोर मेहनत, दृढनिश्चय, शिस्त , चांगले प्रदर्शन याचा उत्सव साजरा करण्याचा प्रसंग आहे.
महान एथलीट मेजर ध्यानचंद जी को उनकी जन्म जयंती पर भावपूर्ण नमन। आज राष्ट्रीय खेल दिवस पर मेरा देश के युवाओं से आग्रह है कि वे खेल और फिटनेस को अपने जीवन का अभिन्न हिस्सा बनाएं। pic.twitter.com/3SqegpeAje — Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) August 29, 2026
केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी देशवासियांना क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘मेजर ध्यानचंद यांच्या 121 व्या जयंतीनिमित ‘फिट इंडिया’ चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी देशभरात विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. या उपक्रमांतर्गत तरुण आणि जनतेला दररोज किमान एक तास खेळाच्या मैदानावर घालवण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.
भंगलं रे भंगलं! 51 वर्षांचे स्वप्न चक्काचूर; शेवटच्या सामन्यात बेल्जियमने केला भारताचा पराभव, थेट…






