IPL 2026 Points Table (फोटो- ट्विटर)
चेन्नई सुपर किंग्जचा सलग 3 रा पराभव
पॉईंट्स टेबलमध्ये उलथापालथ
चेन्नईचा संघ सर्वात तळाला
Tata IPL 2026 Points Table Updates: आयपीएलचे महायुद्ध सुरू होऊन जवळपास एक आठवडा झाला आहे. प्रत्येक संघाने आपले प्रत्येकी एक ते 3 सामने खेळले आहेत. त्यामुळे आता पॉईंट्स टेबलमध्ये देखील मोठे बदल होत आहेत. काल चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात सामना पार पडला. यामध्ये चेन्नईचा 43 धावांनी पराभव झाला. त्यानंतर आता पॉईंट्स टेबलमध्ये कसे बदल झाले आहेत, ते जाणून घेऊयात.
काल चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोरमध्ये सामना झाला. यामध्ये चेन्नईचा पराभव झाला. बंगलोरच्या संघाने कालचा सामना जिंकत पॉईंट्स टेबलमध्ये आघाडी घेतली आहे. तसेच अन्य संघ देखील कुठल्या स्थानावर आहेत, ते जाणून घेऊयात.
सध्या +2.501 च्या रनरेटसह बंगलोरचा संघ पहिल्या स्थानी आहे. दुसऱ्या स्थानावर राजस्थान रॉयल्सचा संघ आहे. तर तिसऱ्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्स आणि चौथ्या स्थानावर पंजाब किंग्जचा संघ आहे. ज्यांचे गूण 4 आहेत, त्यांचे स्थान रनरेटनुसार देण्यात आले आहे.
KKR ला नडावचं लागेल! ‘अजिंक्य’ राहण्यासाठी PBKS विरुद्ध महामुकाबला; पहा हेड टू हेड रेकॉर्ड्स
| क्रमांक | संघ | सामने | विजय | पराभव | गुण |
|---|---|---|---|---|---|
| 1 | रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) | 2 | 2 | ० | 2 |
| 2 | राजस्थान रॉयल्स (RR) | 2 | 2 | ० | 4 |
| 3 | दिल्ली कॅपिटल्स (DC) | 2 | 2 | ० | 4 |
| 4 | पंजाब किंग्ज (PBKS) | 2 | 2 | 0 | 4 |
| 5 | सनरायझर्स हैदराबाद (SRH) | 3 | 1 | 2 | २ |
| 6 | मुंबई इंडियन्स (MI) | 2 | 1 | 1 | 2 |
| 7 | लखनौ सुपर जायंट्स (LSG) | 2 | 1 | 1 | 2 |
| 8 | गुजरात टायटन्स | 2 | 0 | 2 | 2 |
| 9 | कोलकाता नाईट रायडर्स (KKR) | 2 | ० | 2 | ० |
| 10 | चेन्नई सुपर किंग्ज | 3 |
अजिंक्य’ राहण्यासाठी PBKS विरुद्ध महामुकाबला
केकेआरला अजून आपल्या विजयाचे खाते आयपीएलमध्ये उघडता आलेले नाही. तर पंजाबने दणदणीत सुरुवात केली आहे. दोन्ही संघ आतापर्यंत 35 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यामध्ये 21 सामने केकेआरने जिंकले आहेत. तर केवळ 14 सामने पंजाबचा संघ जिंकू शकला आहे. हेड टू हेड रेकॉर्डमध्ये तरी केकेआरचा संघ वरचढ दिसून येत आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये काय स्थिती?
यंदाच्या आयपीएलचा महासंग्राम सुरू झाला आहे. केकेआर अजिंक्य रहाणेच्या आणि पंजाब किंग्जचा संघ श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळत आहे. दरम्यान केकेआर याधीचे आपले पहिले दोन्ही सामने पराभूत झाली आहे. तर पंजाब किंग्जचा संघ दोन्ही सामने जिंकून आले आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात पंजाब किंग्जचे मनोबल निश्चितच वाढलेले असणार आहे. तर केकेआर पहिल्या विजयासाठी आज आपले सर्वस्व पणाला लावताना पाहायला मिळणार आहे.






