आज केकेआर विरुद्ध पंजाब किंग्जमध्ये सामना (फोटो- सोशल मिडिया)
केकेआरचा संघ अजूनही पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत
ईडन गार्डन्सवर होणार महामुकाबला
पंजाब किंग्ज संघ तिसऱ्या विजयासाठी खेळणार
Tata IPL KKR vs PBKS Live: आज कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्जमध्ये सामना रंगणार आहे. या सामन्यावर पावसाचे सावट असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान (IPL 2026) केकेआर आपल्या पहिल्या दोन्ही सामन्यात पराभूत झाली आहे. तर पंजाबने दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. दोन्ही संघांमधील हेड टू हेड रेकॉर्ड जाणून घेऊयात.
केकेआरला अजून आपल्या विजयाचे खाते आयपीएलमध्ये उघडता आलेले नाही. तर पंजाबने दणदणीत सुरुवात केली आहे. दोन्ही संघ आतापर्यंत 35 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यामध्ये 21 सामने केकेआरने जिंकले आहेत. तर केवळ 14 सामने पंजाबचा संघ जिंकू शकला आहे. हेड टू हेड रेकॉर्डमध्ये तरी केकेआरचा संघ वरचढ दिसून येत आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये काय स्थिती?
यंदाच्या आयपीएलचा महासंग्राम सुरू झाला आहे. केकेआर अजिंक्य रहाणेच्या आणि पंजाब किंग्जचा संघ श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळत आहे. दरम्यान केकेआर याधीचे आपले पहिले दोन्ही सामने पराभूत झाली आहे. तर पंजाब किंग्जचा संघ दोन्ही सामने जिंकून आले आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात पंजाब किंग्जचे मनोबल निश्चितच वाढलेले असणार आहे. तर केकेआर पहिल्या विजयासाठी आज आपले सर्वस्व पणाला लावताना पाहायला मिळणार आहे.
आजच्या सामन्यावर पावसाचे सावट
हवामान KKR आणि PBKS साठी एक आव्हान ठरू शकते. हवामान विभागाच्या मते, हवामानाचा केकेआर-पीबीकेएस सामन्यावर परिणाम होऊ शकतो. दिवसभर शहरात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, पावसाची शक्यता आहे. पावसासोबतच, जोरदार वारे आणि मेघगर्जनेमुळेही सामन्यात व्यत्यय येऊ शकतो. सायंकाळी ७:०० ते ८:०० दरम्यान पावसाची ४० टक्के शक्यता आहे, जी पुढील तासात ५० टक्क्यांपर्यंत वाढेल आणि रात्री हळूहळू कमी होईल. अशा परिस्थितीत, सामना कमी वेळेत संपण्याची शक्यता वाढते.
कोलकाता विरुद्ध पंजाब सामन्यासाठी खेळपट्टीचा अहवाल
खेळपट्टीबद्दल बोलायचे झाल्यास, ईडन गार्डन्सची खेळपट्टी साधारणपणे फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. वेगवान आउटफिल्डमुळे धावा करणे सोपे होते. खेळपट्टी सपाट आहे आणि चेंडू चांगला उसळतो, ज्यामुळे फलंदाजांना मुक्तपणे खेळता येते. सामन्याच्या सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना काही प्रमाणात मदत मिळू शकते, परंतु जसजसा खेळ पुढे सरकतो, तसतशी खेळपट्टी संथ होते आणि फिरकी गोलंदाज प्रभाव पाडू लागतात. लहान सीमा आणि दव यामुळे लक्ष्याचा पाठलाग करणे अनेकदा सोपे जाते.






