टेबल टेनिस स्पर्धा (फोटो- सोशल मिडिया)
प्रभात रोड येथील सिम्बॉयसिस स्पोर्ट्स सेंटरच्या टेबल टेनिस हॉलमध्ये या स्पर्धेचे सामने पार पडले. १९ वर्षांखालील मुलांच्या अंतिम लढतीत दुसऱ्या मानांकित अनुज फुलसुंदर याने चौथ्या मानांकित स्वरूप भाडळकरचा ११-६, ६-११, ११-७, ११-७, ११-१३, ११-७ अशा संघर्षपूर्ण सामन्यात पराभव करून जेतेपदावर नाव कोरले.
अनुज हा सिम्बॉयसिस स्कूलमध्ये १ ० वी इयत्तेत शिकत असून, पीवायसी टॉस टेबल टेनिस अकादमीत प्रशिक्षक दीपेश अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.तर १९ वर्षांखालील मुलींच्या अंतिम सामन्यात रुचिता धारवटकरने दिया शिंदेचा ११-६, ११-८, ११-४, ११-६ असा सरळ सेटमध्ये पराभव करत विजेतेपदाचा मान पटकावला. रुचिता ही स. प. महाविद्यालयात १२ वी वाणिज्य शाखेत शिकत असून, इंडिया खेलेगा टेबल टेनिस अकादमीत प्रशिक्षक सन्मय परांजपे यांच्याकडून टेबल टेनिसचे धडे घेत आहे.
Table Tennis: दोन गेममध्ये पराभव मात्र शानदार पुनरागमन; अनन्या पाटीलने मिळवले अजिंक्यपद
१९ वर्षांखालील मुले- उपांत्यपूर्व फेरी
o प्रणव घोलकर [१] वि. वि. आर्यन वानखेडे: ९-११, ११-६, ११-२, ११-९
o स्वरूप भाडळकर [४] वि. वि. सिद्धार्थ पॉल: ११-६, ११-९, ११-३
o निशाद लेले [३] वि. वि. शारंग गवळी: ११-८, ११-५, ११-८
o अनुज फुलसुंदर [२] वि. वि. अद्वैय हुद्दर: ११-६, ११-८, ८-११, ११-७
o अनुज फुलसुंदर [२] वि. वि. निशाद लेले [३]: ११-५, ८-११, ८-११, ११-८, ११-८
· अंतिम फेरी:
o अनुज फुलसुंदर [२] वि. वि. स्वरूप भाडळकर [४]: ११-६, ६-११, ११-७, ११-७, ११-१३, ११-७
Pune Table Tennis Competition: स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या गटात वरदन कोलतेचा सनसनाटी विजय
१९ वर्षांखालील मुली:
· उपांत्यपूर्व फेरी:
o रुचिता धारवटकर वि. वि. जान्हवी फणसे [१]: ११-३, ११-६, ११-४, ११-७
o सई कुलकर्णी [४] वि. वि. निधी भांडारकर [५]: ११-७, ८-११, ११-३, ११-१३, ११-८
o दिया शिंदे वि. वि. नीरजा देशमुख [३]: ११-७, ११-७, ११-६
o तनया अभ्यंकर वि. वि. आद्या गवत्रे [२]: ११-७, ११-७, ९-११, ११-८
· उपांत्य फेरी:
o दिया शिंदे वि. वि. तनया अभ्यंकर: ९-११, ११-४, ११-५, ११-७
· अंतिम फेरी:
o रुचिता धारवटकर वि. वि. दिया शिंदे: ११-६, ११-८, ११-४, ११-६






