MCA Womens Cricket Tournament : साध्वी संजयचे दणकेबाज शतक; ग्लोरियस सीसीचा 10 धावांनी विजय

एमसीए महिला क्रिकेट स्पर्धेत साध्वी संजयच्या 113 धावांच्या शतकाच्या जोरावर ग्लोरियस सीसीने माटुंगा जिमखान्यावर 10 धावांनी विजय मिळवला. गार्गी बांदेकरचे नाबाद 102 धावांचे शतक मात्र माटुंगा जिमखान्याला विजय मिळवून देऊ शकले नाही.
MCA Womens Cricket Tournament : साध्वी संजयचे दणकेबाज शतक; ग्लोरियस सीसीचा 10 धावांनी विजय
MCA Womens Cricket Tournament : साध्वी संजयचे दणकेबाज शतक; ग्लोरियस सीसीचा 10 धावांनी विजय
Published on: 
Updated on: 
  • साध्वी संजयची 108 चेंडूंत 113 धावांची आक्रमक खेळी

  • गार्गी बांदेकरचे 68 चेंडूंत नाबाद 102 धावांचे शतक

  • रिद्धी सिंगचे तीन बळी; ग्लोरियस सीसीचा 10 धावांनी विजय

MCA Womens Cricket Tournament : साध्वी संजयच्या आक्रमक शतकाच्या जोरावर ग्लोरियस सीसीने एमसीए महिला क्रिकेट स्पर्धेत माटुंगा जिमखान्यावर 10 धावांनी विजय मिळवला. साध्वीने 108 चेंडूंत 113 धावांची खेळी करत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. तिच्या या खेळीत 15 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. गोलंदाजीत रिद्धी सिंग आणि स्वरा जाधव यांनी प्रभावी कामगिरी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

प्रथम फलंदाजी करताना ग्लोरियस सीसीने 39 षटकांत तीन बाद 298 धावा केल्या. साध्वीला आरोही बांबोडेने 80, तर स्वरा जाधवने 40 धावा करत चांगली साथ दिली. त्यामुळे ग्लोरियस सीसीला मोठी धावसंख्या उभारता आली. माटुंगा जिमखान्याकडून संजम नटने तीन बळी घेतले.

माटुंगा जिमखान्याचा जोरदार प्रतिकार

39 षटकांत 299 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी उतरलेल्या माटुंगा जिमखान्यानेही जोरदार प्रतिकार केला. गार्गी बांदेकरने अवघ्या 68 चेंडूंत नाबाद 102 धावांची खेळी केली. तिच्या खेळीत 16 चौकारांचा समावेश होता. आया सुकाने 71 धावा करत तिला साथ दिली. मात्र, निर्धारित षटकांत माटुंगा जिमखान्याला सात बाद 289 धावांपर्यंतच मजल मारता आली. ग्लोरियस सीसीकडून रिद्धी सिंगने 21 धावांत तीन, तर स्वरा जाधवने 40 धावांत दोन बळी घेतले.

MCA Womens Cricket Tournament : साध्वी संजयचे दणकेबाज शतक; ग्लोरियस सीसीचा 10 धावांनी विजय
Kabaddi Tournament : निवारा हिड इंडिया महिलांच्या उपउपांत्य फेरीत; पुरुषांत चार संघांची आगेकूच

राजावाडी सीसीची आगेकूच

इतर सामन्यात भारत सीसीने प्रथम फलंदाजी करताना 40 षटकांत 9 बाद 148 धावा केल्या. प्रत्युत्तरात राजावाडी सीसीने 27.4 षटकांत 5 बाद 150 धावा करत पाच गडी राखून विजय मिळवला. राजावाडीकडून अक्षरा बहादूर सिनने 32, तर तनिषा शर्माने 31 धावा केल्या. भारत सीसीकडून आर्य दवणेने तीन, तर तनिषा शर्माने दोन बळी घेतले.

दुसऱ्या सामन्यात दिलीप वेंगसरकर फाउंडेशनने फोर्ट यंगस्टर्सवर सात गडी राखून मात केली. फोर्ट यंगस्टर्सचा डाव 150 धावांत आटोपला. सन्मय उपाशयने 72, तर जान्हवी काटेने 30 धावा केल्या. दिलीप वेंगसरकर फाउंडेशनकडून मुद्रा खेडकरने तीन, तर फातिमा जाफर आणि रिद्धी ठक्कर यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. प्रत्युत्तरात शाहीन रझाकच्या 70 आणि सिमरन शेखच्या 46 धावांच्या जोरावर फाउंडेशनने तीन गडी गमावून विजयाचे लक्ष्य गाठले.

MCA Womens Cricket Tournament : साध्वी संजयचे दणकेबाज शतक; ग्लोरियस सीसीचा 10 धावांनी विजय
Bumrah भाऊने स्टाईलच बदलली? न्यूझीलंडविरुद्धचा Jasprit च्या रनअपचा Video Viral