फोटो सौजन्य - मीडिया
राहुल द्रविड : भारताचा माजी प्रशिक्षक राहुल द्रविडच्या कोचिंगमध्ये भारताच्या संघाने T२० विश्वचषक जिंकून भारताचा दुष्काळ संपवला. आता राहुल द्रविडच्या प्रशिक्षकाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. अलीकडे, द्रविड राजस्थान रॉयल्सचा मुख्य प्रशिक्षक होण्याच्या अटकळींदरम्यान, आता द्रविड इंग्लंड क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक होणार असल्याच्या अफवा सुरू झाल्या आहेत. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) आपल्या एकदिवसीय आणि T२० संघांसाठी नवीन प्रशिक्षक शोधत आहे आणि द्रविड या यादीत एक प्रमुख नाव म्हणून उदयास येत आहे.
राहुल द्रविड हा भारतीय संघाचा जुना खेळाडू आहे, त्याचबरोबर त्याने प्रशिक्षक म्हणून सुद्धा भारतीय संघामध्ये अनेक मोठे बदल घडवले नाही सुधारणा केल्या आहेत. राहुल द्रविड याचे खेळाडू म्हणून अनेक मोठमोठे रेकॉर्ड आहेत त्याचबरोबर त्याचे प्रशिक्षक म्हणून सुद्धा मोठे रेकॉर्ड त्याने नावावर केले आहेत. राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली भारताच्या संघाने जागतिक क्रमवारीमध्ये तीनही फॉरमॅटमध्ये अव्वल स्थान गाठली आहेत, एवढेच नव्हे तर त्याच्या नेतृत्वाखाली भारताने २०२३ च्या विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आणि ऑस्ट्रेलियाचा मायदेशात पराभव केला. अंतिम फेरीत भारताला पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी त्याचे यश उल्लेखनीय आहे.
२०२३ च्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत लवकर बाहेर पडल्यानंतर आणि २०२४ च्या T२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताकडून पराभूत झाल्यानंतर, इंग्लंडने त्यांचे माजी प्रशिक्षक मॅथ्यू मॉट यांचा राजीनामा स्वीकारला आहे. द्रविडच्या नेतृत्वाखाली, भारताने दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिका अनिर्णित ठेवली, २०२२ च्या टी२० विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली आणि २०२३ आशिया कप जिंकला. यासोबतच राहुल द्रविडने T२० वर्ल्ड कप २०२४ मध्ये भारताला विजय मिळवून दिला.त्याच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर आता त्याच्या कोचिंग मागणी जगभरामध्ये वाढली आहे.






